मराठा आरक्षण प्रश्नी भाजपा नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील दोन दिवस सातारा जिल्हा दौऱ्यावर येत असून दिनांक 1 व 2 रोजी ते सातारा जिल्हा दौऱ्यावर असल्याचे समजते
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र च्या वतीने विविध मराठा नेत्यांची प्रत्येक जिल्ह्यानुसार नियुक्ती केली असून सातारा जिल्ह्यासाठी भाजपने सातारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांची नियुक्ती गेल्या काही दिवसांपूर्वी केली होतीत्याच अनुषंगाने हर्षवर्धन पाटील मराठा आरक्षण प्रश्नी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा हा दौरा दोन दिवसाचा असणार आहे यामध्ये विविध मराठा समाजातील विविध संघटनांशी भेटणार असून जिल्ह्यातील मान्यवरांच्या ही गाठीभेटी होणार असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे
हर्षवर्धन पाटील हे सातारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री होते त्यामुळे त्यांना सातारा जिल्ह्याची खडानखडा माहिती असून छत्रपतींच्या राजधानीत हर्षवर्धन पाटील मराठा आरक्षण प्रश्नी काय भूमिका घेतात याकडे आता जिल्ह्यासह महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे त्यांच्या दौर्यात बरीच राजकीय उलथापालथ ही होण्याची शक्यता असल्याचे दिसून येते





