माझी वसुंधरा अभियानांतर्गत सातारा नगरपरिषदेचे दि. 26जानेवारी रोजी पर्यावरण पूरक सायकल रॅली

268
Adv

सातारा नगरपरिषदेतर्फे केंद्र सरकारचे स्वच्छ सर्वेक्षण 2021 सुरु झालेआहे.  राज्य शासनाकडून माझी वसुंधरा अभियानांतर्गत मा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे प्रेरणेने दि. 26 जानेवारी रोजी गोलबाग (राजवाडा) येथून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीचे उद्घाटन नगराध्यक्षा सौ. माधवी कदम व उपनगराध्यक्ष मनोज शेंडे आरोग्य सभापती अनिता घोरपडे यांच्या हस्ते व सर्व सभापती व नगरसेवक यांचे उपस्तिथीत करण्यात येणार आहे.
केंद्र शासनाकडून स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबवण्यात येते. त्याअंतर्गत राज्य शासनाकडून माझी वसुंधरा अभियान सुरु करण्यात आले आहे. माझी वसुंधरा अभियान हा माझी वसुंधरा या उपक्रमांतर्गत पहिला उपक्रम आहे. हा राज्यातील स्थानिक संस्थांना पर्यावरण संवर्धनासाठी निसर्गाच्या पंचतत्वांवर (पंचमहाभूतांवर ) आधारित कृतीशिल उपक्रम आहे.
 आठवड्यातून एक दिवस सायकलचा वापर करुन प्रदूषण विरहित वातावरण निर्माण करुन वसुंधरेच्या सौंदर्यात भर घालण्याचा नगरपालिकेचा मानस आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत  सातारा नगरपरिषद व बी. व्ही. दिक्षित सायकल डिलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘व मा श्री विजय काटवटे नगरसेवक यांच्या विशेष प्रयत्नातून ,प्रदूषण मुक्त सातारा’ करण्यासाठी  दि. 26 रोजी सकाळी 8 वाजता  सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास सर्व सातारकर नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन मुख्याधिकारी अभिजीत बापट, आरोग्य सभापती अनिता अशोक घोरपडे यांनी केले आहे सायकल रॅली गोलबाग-मोती चौक-पोलिस मुख्यालय मार्गे पोवईनाका-राजपथ-कमानी हौदमार्गे पुन्हा गोलबाग अशी काढण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये सर्व वयोगटातील व्यक्तींना सहभागी होता येणार आहे. सहभाग घेणार्‍यांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. सातारकरांनी सायकल रॅलीतउत्स्फूर्त सहभाग नोंदवावा

Adv