महाबळेश्वरचे सहा. नगररचनाकार हावशेट्टी यांची बदली

352
Adv

महाबळेश्वर नगरपालिकेतील सहाय्यक नगररचनाकार विजयकुमार हावशेट्टी यांच्याबाबत अनेक तक्रारी होत्या. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश डावलून त्यांनी अनेक कामे केल्याची चर्चा महाबळेश्वरकरांमध्ये होती. त्यांची बदली करावी अशी मागणी माहिती अधिकार, सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी संचालक नगररचना आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. तसेच बदली न केल्यास उपोषणाचा इशारा दिला होता. त्यांच्या इशा-याची दखल घेत संचालक नगररचना यांनी तक्रार अर्जाची दाखल घेत चौकशी करून विजयकुमार हावशेट्टी यांची बदली केली आहे. त्यामुळे सुशांत मोरे यांच्या आणखी एका आंदोलनाला यश आले आहे.


महाबळेश्वर पालिकेत सहा. नगररचनाकार हावशेट्टी हे गेल्या चार वर्षांपासून एकाच जागी कार्यरत होते. तसेच मध्यंतरी वेण्णा लेक येथील अनधिकृत हॉटेल, लॉज बाबत जिल्हाधिका-यांनी आदेश देऊनही त्याचे पालन न करता आर्थिक तडजोडी केल्याचा आरोप महाबळेश्वरांमधून होत होता. पुणे येथील हिट ॲण्ड रन प्रकरणातील अग्रवाल यांच्या बेकायदेशी एम.पी.जी. क्लबवर कारवाईबाबतही त्यांच्याकडून टाळाटाळ केली जात होती मात्र पुणे येथील घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांचे आदेश येतात त्यांनी कारवाई केली. यासारख्या त्यांच्याबाबत अनेक तक्रारी होत्या. त्यांची बदली करावी अशी मागणी श्री.मोरे यांनी केली होती
तसेच बदली न केल्यास बेमुदत उपोषणाचा इशाराही दिला होता. श्री. मोरे यांच्या तक्रारीची दखल घेत श्री.हावशेट्टी यांची बदली करण्यात आली आहे. दरम्यान ही बदली झाल्यामुळे महाबळेश्वरकरांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

Adv