माढ्याचे खासदार विरोधक देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

1697
Adv

माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे राजकीय विरोधक असलेले विजयसिंह मोहिते पाटील,माढ्यातून खासदारकीसाठी इच्छुक असलेले धैर्यशील मोहिते पाटील आ रणजितसिंह मोहिते पाटील,आ दीपक चव्हाण राम सातपुते माजीमंत्री महादेव जानकर यांनी आज मंत्रालयात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री,यांच्यासह श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई असलेले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चेला उधाण आल आहे

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने धैर्यशील मोहिते पाटील महादेवजानकर यांनी माढ्यातून निवडणूक लढणार असल्याचे विधान करून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना एक प्रकारे विरोधच केला असून या सर्व विरोधकांनी आज मंत्रालयात भाजपचे राजकीय बॉस असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे एक प्रकारे पुन्हा आता टेन्शनच वाढले आहे

येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत दिवसेंदिवस खा रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांची राजकीय अडचण चांगलीच वाढू लागली आहे मंत्रालयात काय चर्चा झाली याचा तपशील समजू शकला नसला तरी येणाऱ्या काळात खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांची राजकीय अडचण वाढली असल्याचे स्पष्ट झाले आहे

Adv