श्रीमंत रामराजें नाईक निंबाळकर यांच्या परफेक्ट नियोजनाने माढ्यातील 3 नेत्यांचा कार्यक्रम

409
Adv

माढा लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या अगोदर पासूनच खासदार रणजितसिहं नाईक निंबाळकर यांना फलटण व अकलूजकरांचा विरोध वाढलेला होता याची योग्य वेळी महायुतीने दखल घेतली असती तर माढा लोकसभा मतदार संघातील निकाल वेगळा असता असे तेथील जाणकारांचे म्हणणे आहे

लोकसभा निवडणुकीपूर्वीच श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व त्यांच्या समर्थकांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध केला होता तीन मोठ्या माढा फलटण मतदार संघातील प्रमुख नेत्यांच्या सभाही फलटण मध्ये पार पडल्या सर्व कार्यकर्त्यांनी एकमुखाने रणजीत निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध केला महायुतीने फक्त उमेदवार बदलावा अशी माफक अपेक्षा माढा मतदारसंघातील नेत्यांसह कार्यकर्त्यांची होती मात्र तसे न झाल्यानेच रणजीत नाईक निंबाळकर यांचा पराभव झाला व भाजपच्या हातातील माढा लोकसभा मतदारसंघ निसटला

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना साथ मिळाली ती अकलूजच्या मोहिते पाटील परिवाराची रणजीतसिहं नाईक निंबाळकर यांचा फलटण व अकलूजकरांच्या परफेक्ट नियोजनाने येथील तीन नेत्यांचा कार्यक्रम केला असल्याची चर्चा सध्या माढा लोकसभा मतदारसंघात रंगू लागली असून विधानसभेच्या वेळी कोण कुणाला धूळ चारणार याची चर्चा माढा लोकसभा मतदारसंघातील परावर रंगू लागली आहे आता तरी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलेल्या परफेक्ट नियोजनाने भल्याभल्यांचा कार्यक्रम लागला हे मात्र नक्की

Adv