Monday, April 20, 2026
spot_img
Home Satara District छ उदयनराजेंचा विजय हा महायुतीच्या शिलेदारांच्या कष्टाचे फलित-

छ उदयनराजेंचा विजय हा महायुतीच्या शिलेदारांच्या कष्टाचे फलित-

692
Adv

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मिळवलेला विजय हा महायुतीतील सर्व जिल्ह्यातील आमदार, ज्येष्ठ नेते यांचे मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व विधानसभा प्रमुख, सर्व विस्तारक, बूथ प्रमुख विधानसभा समन्वयक व विशेषतः सर्व पक्षांच्या महिला आघाडी पदाधिकारी यांनी घेतलेल्या कष्टाचे फलित म्हणून छत्रपतींच्या राजधानीत क्रांतिकारी शाहूनगरीला प्रथमच जिल्ह्याच्या इतिहासात भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दैदीप्यमान विजय मिळविला.

या निवडणुकीला सामोरे जात असताना वरील सर्व पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची भूमिका बजावत असणारे सर्व शहरातील नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष नगरसेवक तसेच ग्रामीण भागातील सर्व आजी-माजी सभापती ,जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांचे सह मतदारांना बूथ पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पार पडणारे महायुती व खासदार उदयनराजेवर प्रेम करणारे सर्वसामान्य मावळे. यांचा उस्फुर्त कामगिरीच्या जोरावर हा ऐतिहासिक विजय उत्सव साजरा करण्याची संधी सातारकरांना उपलब्ध झाली.
तसेच वेगवेगळ्या आघाड्यावरती काम करत असताना सैनिक, शिक्षक ,वकील, डॉक्टर ,कामगार ,उद्योग ,दलित संघटना यासारख्या विविध संघटनांनी दिलेले योगदान हे या विजयाप्रति मैलाचा दगड ठरले.
याशिवाय पोस्टल मतदानाद्वारे सैनिकांच्या जिल्ह्यातील सैनिकांनी आपली जबाबदारी चोख बजावत खासदार उदयनराजेंना भरघोस असे मतदान केले त्या सैनिकाप्रति कृतज्ञता व्यक्त करून या निवडणुकीत हस्ते परहस्ते व ज्ञात अज्ञात नागरिकांकडून झालेले सहकार्य हे देखील तेवढ्याच तोला मोलाच असून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे वतीने मी आपणा सर्वांचे ऋणनिर्देश व्यक्त करतो.

Adv