विधान परिषदेचे माजी आमदार सदाशिव पोळ यांचे चिरंजीव संदीप पोळ यांनी नागपूर येथे सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला यावेळी आमदार राहुल कुल, आमदार संतोष दानवे, राजू पोळ, यशवंत पोळ, विजय चव्हाण, काकासाहेब शिंदे, रघुनाथ माने आदी उपस्थित होते.
विधान परिषदेचे माजी आमदार माण खटावचे किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे स्वर्गीय सदाशिव पोळ तात्या यांचे सुपुत्र जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर संदीप पोळ यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजप जिल्हाध्यक्ष व माण खटाव तालुक्याचे आमदार जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत नागपूर येथे प्रवेश केला
नागपूर येथे डॉक्टर पोळ यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याने माण खटाव तालुक्यात भारतीय जनता पार्टीची ताकद नक्कीच वाढली असून आमदार जयकुमार गोरे यांनाही यामुळे आता आणखीनच राजकीय बळ मिळणार आहे
आमदार जयकुमार गोरे व स्वर्गीय सदाशिवराव पोळ तात्या यांच्या कुटुंबीयांचे राजकीय वैर हे महाराष्ट्राला माहीत होते आता मात्र पोळ व गोरे हे राजकीय संपुष्टात आले आहे