Monday, April 20, 2026
spot_img
Home Maharashtra श्री सेवागिरी महाराजांच्या रथाचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांच्या हस्ते...

श्री सेवागिरी महाराजांच्या रथाचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांच्या हस्ते पूजन

256
Adv

सातारा दि. 22 : लाखो भाविकांचे श्रध्दा स्थान असलेल्या श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रथ पूजन महसुल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी फलोत्पादन, रोजगार हमी मंत्री संदिपान भूमरे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

*राज्यस्तरीय श्री सेवागिरी कृषी व पशु-पक्षी प्रदर्शनाचे*
*महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन*

राज्यस्तरीय श्री सेवागिरी कृषी व पशु-पक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कृषी व पशु-पक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी फलोत्पादन, रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी उभारण्यात आलेल्या विविध स्टॉलला भेटी देऊन स्टॉलची माहिती घेतली. याप्रसंगी श्री. विखे पाटील व श्री. भुमरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

Adv