सातारा- म्हसवड रस्त्याचे रुंदीकरण वादात

320
Adv

जिल्ह्यात अनेक विकास प्रकल्प प्रलंबित असून सातारा-म्हसवड रस्ता यावरील अनेक पुल व इतर विकास कामं कधी होणार? याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागलेले असतांना हैद्राबाद येथील मे.मेघा इंजिनियरींग कंपनीनं स्थानिक सब कंत्राटदारांचे पैसे थकवल्या प्रकरणी गुंडाकरवी कंपनीच्या अधिका-यांनी स्थानिक मराठी कंत्राटराच्या माणसांना बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा निलेश रांजणे, वय-२६ रा. पुणे यांच्या तक्रारीवरून पुसेगाव पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे .

मे.मेघा इंफ्रास्ट्रक्चरचे अधिकारी श्रीनिवास,पांडे (पुर्ण नाव माहित नाही) श्रीनिवास कोपीशेट्टी,श्री मधू (पुर्ण नाव माहिती नाही ) यांचेवर भारतीय दंड संहितेच्या कलम३९५,३५४,१४३,१४७,१४८,१४९,३२३,५०४,५०६ अन्वये गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. फिर्यादित दाखल करण्यात आलेल्या घटनेनुसार श्री निलेश रांजणे,श्रीमती सायरा काझी, शितल घवनट, सना शेख हे सहकारी सातारा-म्हसवड या रस्त्याचे सब कंत्राटदार प्रगती कंस्ट्रक्शन,पुणे या कंपनीचे कर्मचारी असुन, कंपनीच्या सुचनेनुसार कंपनीने केलेल्या कामाचे थकीत बील ६३ कोटी रूपये मिळावे यासाठी, पुसेगाव येथील मेघा इन्फ्रास्ट्रकचरच्या कार्यालयात पाठपुरावा करण्यासाठी या कालावधित जात होते.

दिनांक २८|५|२२ रोजी वर उल्लेख केलेले आरोपी मे.मेघा इंजिनियरींग कंपनीचे मॅनेजर यांनी बोलावून आणलेल्या गुंडाकरवी आमच्यावर हल्ला करून बेदम मारहाण केली, दहा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, पंधरा हजार रूपये या गुंडानी काढून घेतले. असाही उल्लेख या फिर्यादित आहे.हल्ला झाला तेव्हा अतिशय भयभयभीत असल्याने १०\६\२२ रोजी पोलिस स्थानकात उपस्थित राहून फिर्याद दाखल केल्याचे सांगितले. मेघा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने केलेल्या या कामाच्या गुणवत्तेबाबत आधीच सर्वत्र ओरड आहे.पाच वर्ष काम लांबले आहे. शिवाय दररोज पंचवीस लाखांचा दंडही बिलंबामुळे सदर कंपनीस करण्यात आलेला असून, कंपनीनं स्थानिक कंत्राटदारांकडून काम करवून घेऊन पैसे अदा न केल्याबाबतच्या या वादात गुन्हा दाखल झाल्यानं कंपनीच्या एकुणच कार्यपध्दतीबद्दल कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे

.परराज्यातील कंपन्या थेट वरपर्यंत असलेल्या संबधाचा वापर करून अशा पध्दतीनं गुंडगिरी करून कामाची गुणवत्ता, विश्वासार्हता या सगळ्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असेल तर शासनाने कडक पाऊले उचलण्याची गरज आहे.

Adv