पिंपोडे बुद्रुक येथील राम वार्डात गटारांची दुर्गंन्धी

248
Adv

पिंपोडे बुद्रुक प्रतिनिधी
येथील मुख्य बाजार पेठेतील श्री राम वार्डात बंदिस्त गटार नसल्यामुळे दुर्गंधी वाढत असल्याने ग्रामपंचायत सदस्य ,सरपंच तसेंच ग्रामसेवकचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याचे चित्र आहे
या बाबत सविस्तर वृत्त असे की पिंपोडे बुद्रुक हे मध्यवर्ती व्यापारी बाजार पेठेचे ठिकाण असून श्री राम वर्डमध्ये गटारांची दुरवस्था झाली असून ग्रामपंचायत चे कर्मचारी आणि सदस्य फक्त नामधारी आहेत का? असा प्रश्न निर्माण होत आहे श्री राम वार्डमध्ये काही ठिकाणी गटारांची कामे करण्यात आली मात्र त्या गटारावरील चेंबरची झाकनेच गायब झाली आहेत त्यामुळे अशा प्रकारामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे एवढेच नव्हे तर रोग प्रतिबंधक औषध फवारणी देखील ग्रामपंचायत कडून केली जात नसल्याचे पहावयास मिळत आहे
ग्रामपंचायत हद्दीत इतर ठिकाणी सुद्धा विकास कामात दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.विकास कामामध्ये टक्केवारी मिळत असल्यामुळे या कामामध्ये जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे आणि कॉन्ट्रॅक्टर मालामाल आणि जनता हैराण असे चित्र दिसत आहे.काही सदस्य नामधारी असून वार्डाच्या विकासाकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Adv