एमआयडीसी प्रकरणी उत्तर कोरेगावातील सर्व स्थानिक पातळीवरील नेते गप्प का

213
Adv

उत्तर कोरेगावातील एमआयडीसी प्रश्न आता चांगलाच तापला असून राष्ट्रवादीच्या आजी-माजी मंत्र्यांन पुढे लुडबुड व पुढे पुढे करणारे सर्व गावातील स्थानिक नेते गप्प का असा प्रश्न उत्तर कोरेगावातील सर्वसामान्य शेतकरी व युवावर्गाला पडला आहे

सत्ता असताना उत्तर कोरेगावातील पोपटा वानी मिठू मिठू बोलणारे सर्व नेते राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार विद्यमान विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे आमदार मकरंद पाटील ,जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन काका पाटील व राष्ट्रवादीच्या इतर माजीमंत्र्यांपुढे लुडबुड करत असताना दिसत असतात हेच उत्तर कोरेगावातील नेते एमआयडीसी प्रश्नी गप्प असल्याचे दिसून आले स्वतःची पोळी भाजायची वेळ (जिल्हा परिषद पंचायत समिती व इतर पदांसाठी) स्वतःवर वेळ आली की उत्तर कोरेगावातील सर्वच पांढऱ्या कपड्यातील नेते मिठू मिठू पोपटा वाणी आपले तोंड उघडत असतात मात्र एमआयडीसी प्रकरणी अजून एकाही स्थानिक पातळीवरील पुढाऱ्याने ब्र शब्द काढला नसल्याचे दिसून आले

सर्व उत्तर कोरेगावातील स्थानिक पातळीवरील नेते स्वतःच्या पदांसाठी आपल्या पक्षातील नेत्यांपुढे विटू-विटू करताना दिसले आहेत उत्तर कोरेगावातील जमीन राहणार की देणार हा प्रश्न आता युवा वर्गालाच पडला असल्याचे दिसते त्यामुळे आता उत्तर कोरेगावातील शेतकरी व युवा वर्गाने हुशार होऊन या स्वयंघोषित सर्व पोपटपंची नेत्यांना या एमआयडीसी प्रकरणी अद्दल घडवावी अशी अपेक्षा उत्तर कोरेगावातील सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे

Adv