कोरेगावात पराभवाचा चौकार की विजयाची विक्ट्री याकडे लागले जिल्ह्याचे लक्ष

166
Adv

कोरेगाव मतदार संघात आमदार महेश शिंदे विजयाची विक्टरी करणार की आमदार शशिकांत शिंदे पराभवाचा चौकार मारणार हे सर्वस्वी आता कोरेगाव येथील मतदार राजाच्या हातात असून नक्की चौकार की विक्टरी याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे

आमदार शशिकांत शिंदे यांचा जिल्हा बँक आमदारकी लोकसभा
असा सलग तीन वेळा पराभव झाला आहे त्यामुळे कोरेगाव मतदार संघात कभी खुशी कभी गम असे वातावरण आहे कोरेगाव मतदार संघातील गावच्या पारांवर एकच चर्चा रंगते की आमदार शशिकांत शिंदे पराभवाचा चौकार मारणार की विजयाची गुडी उभारणार

आमदारकीच्या दुसऱ्या विजयासाठी आ महेश शिंदे हे सज्ज झाले आहेत गेल्या पाच वर्षात आमदार महेश शिंदे यांनी कोरेगाव मतदारसंघात प्रचंड विकास केला कोरोनाच्या काळातही स्वतः जातीने लक्ष दिल्याने कोरेगावची जनता आमदार महेश शिंदे यांच्या विजयाची विक्ट्री करणार अशी सुद्धा गावातील पारावर चर्चा ऐकायला मिळते

Adv