सातारा पालिकेचे 36 कर्मचारी करणार दिनांक 26रोजी आत्मदहन .उद्या करणार उपोषण

71
Adv

सातारा पालिकेच्या 36 कर्मचाऱ्यांनी सहाव्या वेतन आयोगाच्या मंजुरीसह कायम स्वरूपी सेवेकरिता शुक्रवारी दि24 रोजी लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला आहे . कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे पालिकेचे कामकाज विस्कळीत होणार आहे .

पदांचा आकृतीबंध व व्यपगत झालेल्या पदांची चुकीची माहिती नगरपालिकेकडून सादर झाल्याने 36 कर्मचाऱ्यांना आस्थापनेत सामावून त्यांना वेतन आयोगाचा लाभ देण्याच्या कामाची प्रचंड अडचणं झाली आहे . गेल्या सतरा वर्षापासून छत्तीस कर्मचारी पुनर्वसनाचा कायदेशीर लढा देत असताना लोकप्रतिनिधी व पालिका प्रशासनाच्या इच्छाशकतीच्या अभावामुळे हा प्रश्न लोंबकळत राहिला आहे . त्यामुळे 36 कर्मचाऱ्यांनी गुरुवारी बैठक घेऊन शुक्रवारी दि 24 रोजी लाक्षणिक उपोषणाचा इशारा मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे . या कर्मचाऱ्यांना तत्काळ सहाव्या व सातव्या वेतन आयोगाचा लाभ देण्यात यावा अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे . नगर परिषद संचालनालयाच्या आदेशानंतर सहावा वेतन आयोगाचे लाभ देण्याची पत्रे मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी स्वतःच्या सहीने16 ऑगस्ट 2016 रोजी वितरित केली होती . मात्र तेच मुख्याधिकारी आज या आदेशाची अंमलबजावणी करण्यास नकार देत आहेत . त्यामुळे ३६ कर्मचारी व मुख्याधिकारी यांच्यात खटके उडू लागले आहेत . त्यामुळे कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या कार्यालयासमोर शुक्रवारी दि 24 लाक्षणिक उपोषण व रविवार दि 26 रोजी आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने पालिका वर्तुळात एकच खळबळं उडाली आहे .

Adv