जिल्ह्यातील रेल्वेचे प्रश्न मार्गी लागल्याने समाधान खासदार उदयनराजे

781
Adv

सातारा : राज्यातील नऊ रेल्वे उड्डाणपुलांचा लोकार्पण सोहळा आणि अकरा उड्डाणपुलांचा भूमिपूजन समारंभ रविवारी (दि. ४ जून) दिमाखात पार पडला.लोकार्पण झालेल्या उड्डाणपुलांपैकी दोन सातारा जिल्ह्यातील असून,जिल्ह्यातील एका भुयारी मार्गाचे भूमिपूजनही मान्यवरांच्या हस्ते झाले.यासंदर्भात आपण केलेल्या पाठपुराव्याला यश आले,याचे समाधान आहे, असे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.

रेल्वे क्रॉसिंग सुरक्षित व्हावीत,ती मानवविरहित असावीत आणि वाहतुकीची कोंडी कमी व्हावी,या हेतूने महाराष्ट्र रेलइन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशनने (महारेल)ही कामेहाती घेतली आहेत. या उड्डाणपुलामुळे नागरिकांची इंधन बचत तसेच वेळचीही बचत होणार आहे.लोकार्पण झालेल्या नऊ उड्डाणपुलांपैकी एक सेतु बंधन योजनेअंतर्गत बांधण्यात आला असून, उर्वरित आठ पूल वित्तीय सहभाग तत्त्वानुसार बांधण्यात आले आहेत.सातारा
जिल्ह्यात पाटण-पंढरपूर मार्गावर मसूर आणि शिरवडे रेल्वे स्थानकांदरम्यान फाटक क्र.९२ ऐवजी दोनपदरी उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. तसेच रहिमतपूर- सातारा रस्त्यावर
फाटक क्र.८१ ऐवजी दोनपदरी पूल उभारण्यात आला आहे. जिल्ह्यात कोळवडी-रेवडी रस्त्यावर पळशी ते जरंडेश्वर रेल्वे स्थानकां दरम्यान फाटक क्र.५२ ऐवजी भुयारी मार्गकरण्यात येणार असून,त्याचे भूमिपूजनही रविवारी संपन्न झाले आहे. जिल्ह्यातील सर्वच रेल्वे फाटकांऐवजी उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग करून वाहतूक सुरक्षित,सुरळीत करण्याचाप्रयत्न यापुढेही राहील,असे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीस
दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुण्याच्या शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालय मैदानात पार पडला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील,राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.रेल्वे क्रॉसिंगजवळ नेहमीच वाहतूक कोंडी होते.विशेषतः साखर कारखान्यांच्या हंगामात कोंडीचे
प्रमाण वाढते.जिल्ह्यातील वाढती वाहतूक विचारात घेता यापुढेही सेतुबंधन योजनेअंतर्गतउड्डाणपूल आणि भुयारी मार्गांच्या मंजुरीसाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे खासदार
श्री.छ.उदयनराजे यांनी नमूद केले आहे. जिल्ह्यातील सर्व रेल्वे क्रॉसिंग फाटक विरहितकरण्याचा आपला निर्धार असून, भविष्यात प्रामुख्याने देऊर येथील फाटकाला पर्याय उपलब्ध करून दिला जाईल,असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले पत्रकात म्हटले आहे.

Adv