Saturday, April 25, 2026
spot_img
Home Satara District Satara City गृहराज्यमंत्री देसाईंच्या जिल्ह्यात खून सत्र रोखण्यासाठी कायदा-सुव्यवस्थेचा सायरन वाजणार का?

गृहराज्यमंत्री देसाईंच्या जिल्ह्यात खून सत्र रोखण्यासाठी कायदा-सुव्यवस्थेचा सायरन वाजणार का?

144
Adv

महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून खून सत्र सुरूच असल्याने कायदा व सुव्यवस्था रोखण्यासाठी सायरन वाजणार का अशी आशा आता जिल्ह्यातील नागरिकांना वाटू लागली आहे

सातारा शहरासह शेजारील परिसर तसेच कराड व वाई तालुक्यासह अन्य तालुक्यात ही खुनाचे सत्र सुरू असल्याने जिल्ह्यातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, सातारा जिल्हा महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांचा जिल्हा म्हणून आज महाराष्ट्रात ओळखला जातो त्याचांच जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून खुनाचे सत्र सुरू असल्याने कायदा व सुव्यवस्था रोखणार कोण असा प्रश्न उभा राहिला आहे ? दस्तुरखुद्द गृहराज्यमंत्री देसाई यांच्या जिल्ह्यातच अशी अवस्था असेल तर महाराष्ट्रात सर्वसामान्य नागरिकांची अवस्था कशी असेल असा प्रश्न उपस्थित झाला आहे

गेल्या महिन्याभरापासून समर्थ मंदिर, बोगदा परिसर , काल झालेला कृष्णानगर, कराड शहरात एकाच आठवड्यात झालेले दोन खून यांच्यासह वाई (मांढरदेवी)येथे खून झाले असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी अपेक्षा कोणाकडून बाळगायची असा प्रश्न उपस्थित झाल्याने राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी आता गुन्हेगारांसाठी आपल्या अधिकाराचा सायरन वाजवत गुन्हेगारी वर वचक बसेल अशया सक्त सूचना जिल्हा पोलिस दलाला द्याव्यात व गुन्हेगारांवर कसा अंकुश राहील अशी ठोस उपाययोजना करावी अशी आशा सर्वसामान्य सातारा जिल्ह्यातील नागरिकांना राज्यमंत्री देसाई यांच्याकडून वाटू लागली आहे

Adv