पालिकेच्या उपाध्यक्षपदी शेंडे तर स्वीकृत सदस्यपदी ढेकणे यांची गुरुवारी निवड होण्याची शक्यता ?

53
Adv

सातारा पालिकेच्या उपनगराध्यक्ष पदी युवा व लोकप्रिय नगरसेवक मनोज शेंडे तर तब्बल एक तपानंतर बाळासाहेब ढेकणे यांची स्वीकृत सदस्यपदी निवड होण्याची शक्यता आहे

पालिकेच्या उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्य पदाची निवड येत्या गुरुवार पर्यंत होण्याची शक्यता नाकारता येत नाही यावेळी सातारा विकास आघाडीकडून प्रभाग क्रमांक 10 मधून निवडून आलेले लोकप्रिय नगरसेवक मनोज शेंडे यांची सातारा पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी निवड जवळजवळ निश्चित मानली जाते त्याचबरोबर करंजे येथील बाळासाहेब ढेकणे यांचीही सातारा पालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी निवड होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने होणार्‍या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे

करंजे गावाला आता बाळासाहेब ढेकणे यांच्या रूपाने तिसरा नगरसेवक मिळण्याची शक्यता मानली जात असून ,नगरसेवक मनोज शेंडे व बाळासाहेब ढेकणे हे करंजे येथे राहतात या दोघांच्या निवडी होण्याच्या शक्यतेमुळे आता करंजे गावात डबल धमाका असल्याची चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे करंजे येथे दिवाळी आधीच दिवाळी साजरी होण्याची शक्यता मानली जाते

Adv