सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅन्क ही देशातील सहकारामधील एक अन्नगण्य बॅन्क आहे.या बॅन्केत फारसे राजकारण नाही,हे सांगायला बरं वाटतं म्हणण्यापेक्षा अभिमान वाटतो. याबॅन्केच्या
माध्यमातुन हौसिंग सोसायटी आणि दुग्ध संस्थांचे प्रतिनिधीत्व करताना, सहकाराचा जास्तीत जास्त लाभ सभासदांना होण्यासाठी प्रयत्न केला आहे.सभासदांच्या आब्रह आणि इच्छेनुसार आम्ही याच मतदार संघातुन बॅन्केची निवडणुक लढण्याचे निश्चित केले आहे. त्यास भरभरुन आशिर्वाद दयावेत
असे आवाहन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी करतानाच, सहकार चळवळीचा मुळ उद्देश बाजुला पडला आहे, शेतक-यांपेक्षा स्वतःचा स्वार्थ साधण्याचा सध्या सुरु असलेल्या अनेक प्रयत्नामुळे शेतकरी सभासदांवर होणारा अन्याय एक व्यक्ती म्हणून आम्ही सहन करणार नाही त्याचा
बंदोबस्त करु असा घणाघात केला. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅन्केच्या गृहनिर्माण आणि दुग्धविकास सहकारी संस्था
मतदार संघातील मतदार सभासद-कार्यकत्यांचा मेळावा सातारा येथील हॉटेल लेक व्हयु येथे आज आयोजित करण्यात आला होता त्यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले बोलत होते.
व्यासपिठावर भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष भरत पाटील कराड नगरपरिषदेचे गटनेते राजेंद्रसिंह यादव,पंचायत समितीचे महाबळेश्वरचे माजी सभापती विजयराव भिलारे,कराडचे
प्रा.आर.के.पाटील आनंदराब गोळे,जयवंतराब बनसोडे, सौ.रत्नमाला निकम, यांची प्रमुख उपस्थिती होती.१९३२ साली सहकार कायदा आला आणि सहकार क्षेत्र एक चळवळ बनली. सहकारातील संघटीत प्रयत्नांमधुन शेतकरी बांधवांच्या आर्थिक, सामाजिक उन्नतीसाठी ख-या अर्थाने पाणीपुरवठा,
गृहनिर्माण, दुग्धविकास, कुक्कुटपालन, शेळीपालन, ग्रामिण सहकारी पतसंस्था, सहकारी बॅन्का,सोसायट्या, वाहतुक अश्या विविध संस्था उभारण्यात आल्या. एकमेका सहारूय करु अवघे धरू सुपथ असा विचार सहकाराच्या पाठीशी होता. परंतु अलिकडच्या काळात सहकाराच्या माध्यमातुन शेतकरी
सभासदांच्या हिताचे उपदेश दयायचे आणि करायचे मात्र स्वत:च्या फायदयाचे ही भावना शिरली. अनेक संस्था याच घातक स्वाहाकारी विचारातुन खाजगी झाल्या. सहकाराचे नेतृत्व व्यक्तीकेंद्रीत झाले. परिणामी अनेक संस्था,बॅन्का अवसायानात गेल्या. त्या संस्थांवर अवलंबून असलेल्यांचे हाल झाले.
खरंतर ज्यांनी सहकार चळवळ मोडीत काढली त्यांची पदे रद्द केली गेली पाहीजेत त्यांना कोणत्याही संस्थांचे सभासद-संचालक म्हणून देखिल निवडणुक लढवण्यास बंदी कली गेली पाहीजे. आपल्या विचारांची संस्था नाही तर मग त्यांचे निवडणुकीतील मताचे ठराब अवैध ठस्युन, संकुचित वृत्तीने सहकार क्षेत्र आज बाकपले जात आहे मताला अवैध ठरवलेल्यांना अवैध ठरवण्यापूर्वी संधी सुध्दा दिली नव्हती, त्याचा खेद वाटतो. ज्यांचे मतदानाचे ठराब अवैध ठरवले गेले
त्यांनी असं कोणतं पाप केले होते, त्यांनी कुणासारखा भ्रष्टाचार केला नव्हता किंवा त्यांची ईडीची चौकशी लागली नव्हती. परंतु फक्त आपल्या विचारांचा नाही म्हणून मतदानाला अपात्र हा पवित्रा आम्ही हाणुन पाडला. अश्या प्रकारचा कोणताही अन्याय एक व्यक्ती म्हणून आम्ही सहन करू शकत नाहीत, त्याचा योग्य पध्दतीने सनदशीर मार्गान बंदोबस्त करण्यास आम्ही आता मागे पुढे पहाणार नाही असे नमुद करुन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मतदार संभासदांना आपले निवडणुकीचे मत महत्वाचे आहेच कारण उदयनराजे स्वतःच्या एकटयाच्या मतावर निवडुन येवू शकत नाहीत हे खरं असलं तरी आपले वैचारिक मत आम्हाला अधिक महत्वपूर्ण आहे असे सांगीतले.







