खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या साधेपणाचा अनुभव आपल्याला बराच वेळा आलेला आहे तशाच प्रकारचा अनुभव आज एक अपंग व्यक्ती च्या गणपती स्टॉलला भेट देऊन पुन्हा एकदा आला खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्या साधेपणामुळे साताऱ्याची जनता त्यांच्यावर अतूट प्रेम करते त्यामुळे ते म्हणतात माझा पक्ष हा जनताच आहे
शैलेंद्र बोर्डे” हा सातारा शहरात फिरुन कॅलेंडर विकून आपली उपजीविका भागवत असे. यामध्ये कॅलेंडर विक्री करत करत लिंबू-सरबत हाही व्यवसाय करत होता. आपण अपंग असलो तरी आपण काम करुन पोट भरलं पाहिजे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्याने अपंगत्वावर मात करत आपणही उद्योगधंदा केला पाहिजे ही जिद्द उराशी बाळगून छोट्या व्यवसायातून मोठ्या व्यवसायाकडे जाण्याचा मोठा निर्णय घेतला. स्वकर्तृत्वाने त्याने गणपती स्टॉल टाकायचा निर्धार केला.
यामध्ये त्यांना दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्था सातारा यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सतत गरीबांसाठी झटणारे खा. उदयनराजेंनी गणपती स्टॉलला धावती भेट घेत शैलेंद्रचे अभिनंदन केले. येथून पुढे तुला कोणतीही अडचण आली तर नक्की सांगा असे खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले अपंगबांधव शैलेंद्र बोर्डे यांना म्हणाले