कोरोनाच्या महामारी चे संकट दूर करण्यासाठी जगभर सर्व परी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत त्यामध्ये डॉक्टर नर्स पोलीस यंत्रणा तसेच प्रशासकीय यंत्रणेसह नागरिकांनाही कोरणाचा सामना करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहोत गेल्या पाच महिन्यापासून संपूर्ण देशात लाँकडाउन सुरू असून लाँकडाउन मुळे अनेक समस्याही निर्माण झाले आहेत सर्वसामान्य नागरिकांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे त्याचबरोबर डॉक्टर आणि उपचार अशी संबंधित सर्व यंत्रणांवर मोठा तान निर्माण होत आहे यंत्रणा गेल्या पाच महिन्यांपासून अहोरात्र काम करत आहे तरीही त्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागत असून त्यावर योग्य ती उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यात सक्षम अशी यंत्रणा उभी करण्याची गरज निर्माण झाली आहे त्यासाठी माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्यातील वैद्यकीय व्यवसायिक यांचे विशेष बैठक निमंत्रित केली होती या बैठकीत सखोल चर्चा होऊन सातारा जिल्ह्यात टासक फोर्स निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला त्याबाबतची घोषणा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी या बैठकीत केली
कोरोनाच्या महामारी रोखण्यासाठी अद्याप ठोस अशी कोणतीही उपाययोजना उपलब्ध नाही जगभरामध्ये कोरणा वर मात करण्यासाठी लसीचे संशोधन सुरू असून अद्याप बाजारात आलेली नाही त्यामुळे आहे त्या परिस्थितीत काम करण्याची वेळ वैद्यकीय क्षेत्रावर आली आहे रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्या यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे त्यामुळे कोरोणा व्यतिरिक्त इतर आजाराने ग्रासलेल्या रुग्णांना उपचार मिळणे कठीण झाली आहे त्यातून मार्ग काढण्यासाठी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली अनेक डॉक्टर्स दैनंदिन प्रॅक्टिस करताना अनेक समस्यांना सामोरे जात आहेत आतापर्यंत सर्व व्यवसायिकांनी प्रशासनाला सहकार्याची भूमिका बजावली
यावेळी बोलताना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले की कोरोना संकट हे संपूर्ण जगभरात असून या संकटावर मात करण्यासाठी अनेक ठिकाणी त्या उपाययोजना केल्या त्याचा विचार करता सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला अनेक गोष्टींमध्ये बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे विशेष लाँक डॉऊन मुळे सर्वसामान्यांच्या रोजीरोटीची समस्या गंभीर बनत चालली आहे गेली पाच महिने लाँकडॉऊन करून सुद्धा रुग्णांची संख्या कमी झालेली दिसत नाही त्यामुळे लाँक डॉऊन च्या माध्यमातून आपण नेमके काय साध्य केले यावर विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे त्याचबरोबर जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळतात त्यामध्ये रुग्णांची वर्गवारी केली पाहिजे ही बाब पुढे येत आहे त्याबाबत नियोजन करण्याची गरज असून यावेळी वैद्यकीय व्यवसायिकांनी उपस्थित केलेल्या समस्यांवर उपाययोजना करण्याचे आश्वासन माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यावेळी दिले या बैठकीत सातारा जिल्ह्यातील नामवंत डॉक्टर उपस्थित होते