अमित शहा यांना जिल्हा बँकेच्या भेटीचे निमंत्रण

393
Adv

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवाच्या निमित्त जिल्हा बँकेच्या भेटीसाठी व नियोजित कार्यक्रमासाठी देशाचे सहकार मंत्री अमित शहा यांची दिल्ली येथे भेट घेऊन बँकेचे चेअरमन नितीन पाटील, सिओ राजेंद्र सरकाळे यांनी निमंत्रण दिले

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अमृत महोत्सव समारंभाच्या निमित्ताने दिल्ली येथे देशाचे गृह व सहकार मंत्री अमित शहा यांची बँकेचे अध्यक्ष मा.श्री.नितीन काका पाटील यांनी भेट घेतली सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 75 वर्षाचा प्रगती पर कामकाजाचा लेखाजोखा अमित भाई पुढे मांडला आणि बँकेच्या अमृत महोत्सवी सांगता समारंभासाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले.. 20 ऑगस्ट ते पाच सप्टेंबर यादरम्यान देशाचे सहकार मंत्री दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे

NCDC च्या माध्यमातून किसनवीर आणि खंडाळा साखर कारखान्यांच्या पुनरुज्जीवनासाठी दिलेल्या कर्जरुपी मदतीबद्दल अमित भाई यांचे आभार मानले..
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.खा. सुनीलजी तटकरे , मा.खा. प्रफुल भाई पटेल आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे उपस्थित होते…

Adv