क्रेन मालकांनी वाहतूक शाखेत दरपत्रके सादर करण्याचे आवाहन

80
Adv

:  सातारा शहरातील वाहतुक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी नो पार्कींग मध्ये लावण्यात आलेली वाहने क्रेनच्या साह्याने टोईंग करण्यासाठी पोलीस अधीक्षक यांच्या मान्यतेने वाहतूक नियंत्रण शाखा, सातारा शहर येथे खासगी क्रेन भाडेतत्वावर शर्ती व अटींचा करार करुन कार्यरत ठेवण्यात आल्या आहेत या क्रेनचा करार संपत आल्याने नवीन क्रेनची नियुक्ती करण्यात येणार आहे.

 दुचाकीसह चारचाकी वाहने उलचण्याची सुविधा आहे अशा इच्छुक क्रेन मालकांनी भाडेतत्वावर शर्ती व अटी याबाबतचा करार करुन वाहतूक नियंत्रण शाखा, सातारा येथे कार्यरत ठेवण्यासाठी  दरपत्रके बंद लिफाफ्यामध्ये वाहतुक नियंत्रण शाखा, सातारा शहर येथे 15 डिसेंबरपर्यंत सादर करावीत, असे आवाहन वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक व्ही.ए. शेलार यांनी केले आहे.

Adv