सातारा पालिकेचे प्रभाग क्रमांक 10 चे लोकप्रिय नगरसेवक मनोज शेंडे यांनी स्वखर्चाने पाच ऑक्सिजनच्या मशीन घेतल्या असून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वतीने त्यांना एक मशीन देण्यात आली आहे अशा सर्व मिळून नगरसेवक मनोज शेंडे यांच्याकडे सहा ऑक्सीजन मशीन जमा झाले आहेत सध्या ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने ऑक्सीजन मशीन घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे नगरसेवक मनोज शेंडे यांनी सातारानामाशी बोलताना सांगितले
स्वतः कोरोना वर मात करून नगरसेवक मनोज शेंडे पुन्हा एकदा प्रभागातील व करंजे नागरिकांची सेवा करण्यासाठी सज्ज झाले आहेत नगरसेवक मनोज शेंडे यांनी लॉक डाऊन च्या काळात स्वखर्चाने सुमारे पाचशे कुटुंबांना तीन महिने पुरेल एवढा किराणा व किट चे वाटप केले होते स्वखर्चाने पाचशे कुटुंबांना किराणा किट देणारे नगरसेवक मनोज शेंडे सातारा पालिकेतील एकमेव नगरसेवक ठरले होते
साताऱ्यात स्वखर्चाने प्रभागासाठी व शहरातील नागरिकांसाठी अडी अडचणी साठी खर्च करण्यात नगरसेवक मनोज शेंडे यांनी कधीही मागे पुढे पाहिले नाही समाजाला आपण काहीतरी देणे लागतो या उद्देशाने ते समाजासाठी जिथे गरज असेल तिथे ते स्वतः जातीने उभे राहुन मदत करत असतात २ ऑक्सीजन मशीन प्रभागातील नागरिकांसाठी २ ऑक्सीजन मशीन हे करंजे ग्रामस्थांसाठी व २ मशीन या सातारा शहरासाठी देणार असून मशीन साठी संपर्क क्रमांकही त्यांनी दिले असून ते पुढील प्रमाणे मनोज शेंडे:९८२२०९०४६८ , राजेंद्र कुंभार ९९२२२७०७७७, राम बाबर ९०४९१८७७९८, रोहित जाधव,९६६५८५८८४४, किरण कुराडे ७०२०५६१४११, अनिंस भाई सय्यद८४४६८६५५५५, रोहित सावंत८००७६२१००७
या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन ही लोकप्रिय नगरसेवक मनोज शेंडे यांनी केले आहे ऑक्सीजन मशीन घेतल्याने नगरसेवक मनोज शेंडे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे