लॉकडाऊन च्या अनुषंगाने साताऱ्यात नागरिकांचा गर्दीचा महापुर

41
Adv

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दि. 17 ते दि. 26 पर्यंत लॉकडाऊन पुकारला आहे. सर्व दुकाने बंद होणार असल्याने सातारा शहरासह अनेक गावातील नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. सातारकरांनी आज मात्र गर्दीचा महापूर बघितला

मर्यादित वेळेमुळे काहींनी सकाळपासूनच दुकानांसमोर रांग लावली होती. परिणामी बुधवारी गर्दीचा महापूर अनुभवण्यास मिळाला. या गर्दीमुळे अनेक चौकांमध्ये वाहतुकीची कोंडी झाली होती. अनेक दुकानांमध्येही झालेल्या गर्दीवर कंट्रोल करणे व्यावसायिकांनाही अशक्‍य बनले होते.

दिवसेंदिवस वाढत्या करोना बाधितांच्या संख्येमुळे शासनाने बाजारपेठेच्या वेळेवर मर्यादा आणली होती. परंतु गेल्या दोन दिवसांमध्ये बाधितांची संख्या आणखीनच वाढू लागल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी अखेर दि. 17 पासून लॉकडाऊन पुकारला आहे. यामध्ये दि. 17 ते दि. 22 अखेर पूर्णत: बाजारपेठ बंद असणार आहे. तर दि. 22 ते दि. 26 जुलैपर्यंत अंशत: बंद पुकारला आहे. या काळातही मर्यादित वेळेतच दुकाने सुरू राहणार आहेत.

त्यामुळे सातारा तालुक्‍यातील अनेक गावातील नागरिकांनी तसेच शहरातील नागरिकांनीही खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात शिथीलता दिल्यानंतर शासनाने बाजारपेठ सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत खुली ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, जुलै महिन्याच्या सुरूवातीपासून ग्रामीण भागात करोना बाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने सातारा जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी बाजारपेठे बंद करण्याच्या वेळेत बदल करून ते सायंकाळी 5 ऐवजी दुपारी 2 चे केले.

हा बदल करूनही बाधितांची संख्या आटोक्‍यात येत नसल्याने जिल्हाधिकारी यांनी कडक लॉकडाऊन पुकारला आहे. तर पाच दिवस अंशत: बाजारपेठ सुरू राहणार आहे. मंगळवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान हा आदेश जाहीर करण्यात आला. परिणामी बुधवारी सकाळपासूनच सातारा शहरासह तालुक्‍यातील विविध गावातील नागरिकांनी किराणा मालासह इतर खरेदीसाठी गर्दी केली होती.

यामध्ये दुचाकी व चारचाकी धारकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या या वाहनधारकांमुळे सर्व चौकांमध्ये वाहतूक कोंडी झाली होती. याशिवाय सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचेही उल्लंघन झाले. मात्र, करोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने लॉकडाऊन पुकारले असले तरी तत्पूर्वी निर्माण होणाऱ्या गर्दीवरही प्रशासनाने कंट्रोल ठेवणे गरजेचे आहे.

Adv