सत्ता गेल्यानंतर काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात मरगळ आलेली अजून झटकली नसल्याने कार्यकर्ते चार्ज होणार तरी कधी असा प्रश्न जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना पडला आहे
जिल्हाध्यक्ष पद हे मिरवायचे नसते तर ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी बळ देण्यासाठी या पदाचा उपयोग करावा लागतो मात्र आपण जिल्हाध्यक्ष असून सर्व काही आपल्याच घरी मंत्री आले तरी आपल्या घरी असेच करत राहिले तर राहिलेले कार्यकर्तेही दुसऱ्या पक्षाची वाट धरायला वेळ लागणार नाही अशी खंतही काही काँग्रेस नेत्यांनी बोलून दाखवली
भाजप सत्तेत आल्यावर सातारा जिल्ह्यातील काँग्रेस पूर्ण मरगळ आलेली होती माजी आमदार मदन दादा भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर आमदार जयकुमार गोरे यांनीही भाजप मध्ये प्रवेश करून काँग्रेसला मोठा फटका दिला होता रणजीत निंबाळकर हे जिल्हाध्यक्ष असतानाच त्यांनी राजीनामा देऊन हातात कमळ घेतले व खासदार झाले हे कमी की काय म्हणून ज्यांनी काँग्रेस पक्ष वाढवण्यास खरी मदत केली ते आमदार आनंदराव पाटील हेही पक्षा पासून आता दूर गेल्याचे दिसते त्यामुळे जरी नवीन पदाधिकारी आले असले तरी मरगळ मात्र तीच दिसून येते
चौकट
जिल्हा काँग्रेस कमिटीचे नियोजन करावे ते नानानीच
सत्ता असो व नसो जिल्हा काँग्रेस कमिटीचे खरे नियोजन होते ते आमदार आनंदराव पाटील यांचे त्यांच्यासारखा जिल्हाध्यक्ष पुन्हा होणे नाही नुसते जिल्हाध्यक्ष होऊन उपयोग नसतो तर तळागाळातल्या कार्यकर्त्याला मानसन्मान मिळाला पाहिजे याची खबरदारी आनंदराव नानांनी घेतली होती त्यामुळेच काँग्रेस मजबूत होती आत्ताचे पदाधिकारी मात्र मंत्री नेते आले की पुढे पुढे दिसतात इतर वेळेस कुठे गायब असतात हे त्यांचे त्यांनाच माहिती त्यामुळे खरे काँग्रेसचे नियोजन करावे ते आनंदराव नानांनीच