मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यभर सभांचा धुरळा उडवत आहेत. जिल्ह्याजिल्ह्यात जाऊन मुख्यमंत्री विकासकामांची आश्वासनं देत आहेत. मुख्यमंत्र्यांची दोन दिवसा पुर्वी साताऱ्यातील माण मतदारसंघात प्रचारसभा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजपकडून दुसऱ्या मंत्र्यांची एकप्रकारे अप्रत्यक्ष घोषणा केली. माण खटाव मतदारसंघातील भाजप उमेदवार जयकुमार गोरे यांना निवडून द्या, त्यांना मंत्रिपद देऊ, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.
त्याआधी मुख्यमंत्र्यांनी कर्जत-जामखेडमध्ये राम शिंदे (Ram Shinde) यांना जेवढ्या जास्त मतांनी निवडून द्याल, तेवढं मोठं मंत्रिपद देऊ असं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राम शिंदेंनंतर आता दुसरा मंत्री ठरवल्याचं चित्र आहे.
जयकुमार गोरे यांना जर चांगल्या मताधिक्याने निवडून दिलं, तर मी त्यांना मंत्रिपद देईन, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी म्हसवड येथील सभेत दिला.