शिंदी बु. गट नंबर ६००पूर्वीचे सर्वे नं, १६९ व १७१ ) क्षेत्र १४ हे. ४२ आर. हि जमीन शिंदी बुद्रुक येथील सर्व खातेदारांची असून या मधील सुमारे ९ एकर क्षेत्र तुपेवाडी लघुपाटबंधारे करीत अधिग्रहण झाले असून याचे मोबदला कामी आणेवारी जुळविताना तलाठी यांचा गैरप्रकार उघड झाला आहे.
पूर्वी पासून ते सन २०१२ पर्यंत शिंदी बु येथील गट नंबर ६०० मध्ये ज्यांच्या नावाची कोणती हि नोंद नव्हती अशा
खातेदारांची सन २०१२ साली तत्कालीन गाव कामगार तलाठी मौजे शिंदी बु यांनी सुमारे ९७ गुंठे क्षेत्राची वाढीव नोंद फेरफार अथवा कोणत्या हि कायदेशीर दस्त ऐवजाशिवाय काहींनी दिलेल्या आर्थिक अमिषास बळी पडून मूळ गाव नमुना ७/१२ मध्ये कब्जेदार सदरी वाढीव क्षेत्राचा अंमल दिला आहे. यामुळे अनेकांचे हक्कावर गदा आली आहे. या संबंधित तलाठी यांचे कार्यकाळात भ्र्ष्टाचार करून असे सरकारी रेकॉर्ड मध्ये अनेक चुकीचे
बदल केलेचे उघड झाले आहे.
वास्तविक ७ / १२ पुस्तक हि गाव चे प्रमुख अधिकार अभिलेख असून यातच काही अमिषा पोटी भ्र्ष्टाचार करून मूळ अधिकार अभिलेख बदलणाऱ्या तत्कालीन गाव कामगार तलाठी यांची तात्काळ खातेनिहाय चौकशी करून त्यांना निलंबित करून त्यांना हे बेकायदेशीर काम करण्यास भाग पडणाऱ्या संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करून शिंदी बुद्रुक येथील गट नंबर ६०० चे ७ / १२ रेकॉर्ड तात्काळ दुरुस्त करून मिळावे असे निवेदन माननीय उपविभागीय अधिकारी दहिवडी याना देण्यात आले. या वेळी निवासी नायब तहसीलदार श्री. दीक्षित यांनी निवेदन स्वीकारून चौकशी आश्वासन दिले. या निवेदनाच्या प्रति मा. महसूलमंत्री आणि मा.जिल्हाधिकारी सातारा याना पाठविणेत आल्या आहेत यावर तात्काळ कारवाई न झालेस लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे