भाजपचे पदाधिकारी नाराज.. अध्यक्षांच्या वागणुकीने बालेकिल्ला होऊ शकतो राष्ट्रवादीमय

780
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
Adv

भाजपची सत्ता आणण्यास ज्या सर्वसामान्य भाजप कार्यकर्त्यांनी दिवस रात्र एक केले अशा कार्यकर्त्यांना विसरून जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम सरचिटणीस विठ्ठल बलशेठवार सातारा शहर प्रमुख विकास गोसावी,शिवनामे, बोराटे आदी पदाधिकारी मंत्री महोदयांच्या पदभार स्वीकारताना उपस्थित होते त्यामुळे भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता नाराज झाला असलेले दिसून येते शिस्तबद्ध पक्ष असल्याने जाहीर नाराजी व्यक्त करता येत नाही पदाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

लोकसभा विधानसभा निवडणुकीत भाजपच्या जिल्ह्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी दिवस रात्र करून महायुतीसह भाजपचे आमदार निवडून आणले मात्र आता सातारा जिल्ह्यात भाजप या पक्षात लोकशाही नसून धैर्यशील शाही पाहायला मिळत आहे मोजकेच पदाधिकारी घेऊन आपली टीमकी वाजवायची व मी किती मोठे पक्षासाठी काम केले हे केविलवाणी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत माढ्यासह लोकसभेला कोणी काय दिवे लावले हे जिल्ह्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्याला विसरून स्वतः मंत्री झाल्या असल्याचा रुबाब आणून धैर्य गमावलेले दादा आज मंत्रालयात दिसले ज्या जिल्हाध्यक्षांना सातारा शहरात आनंद उत्सव साजरा करण्यासाठी 20 पदाधिकारी जमत नाहीत ते मात्र मंत्रालय स्वतःचे कार्यकर्ते घेऊन खादी ची कपडे घालून मंत्र्याचा रुबाब आणताना दिसले

भाजपचा विठ्ठल फक्त टेंडरच्याच मागे या विठ्ठलाला फक्त स्वतःची कमाई दिसते स्वतःचे पक्ष वाढीसाठी योगदान शून्य दादा मामा भाऊ काका करत स्वतःचे पद शाबूत ठेवून याच विठ्ठलाने कोट्यावधीची टेंडर आपल्या पदरात पाडून घेतली आहेत मात्र भाजपचा प्रामाणिक आणि सच्चा कार्यकर्ता पक्षासाठी झटत असून याला फक्त झेंडा हाती धरण्याचे काम या पदाधिकाऱ्यांनी दिले असल्याचे दिसून येते

शहर प्रमुखांची लुडबुड कोणासाठी

इतर वेळी प्रत्येकाच्या नावाने शिमगा करणारे शहर प्रमुख आज मात्र धैर्य गमावलेल्या दादाच्या हाताखाली असल्याचे मंत्रालयात दिसून आले

भाजपचे सच्चे कार्यकर्ते आज कुठेही समोर येताना दिसत नाहीत मात्र काँग्रेस विचारी जिल्हाध्यक्ष असल्याने ठराविक टीम गोळा करून मलिदा खाण्याचीच प्रक्रिया यांनी एक प्रकारे सुरू केली असल्याचे दिसून येते

युवक व महिला आघाडीचे पदाधिकारी पदभार स्वीकारताना का नव्हते उपस्थित

युवक व महिला आघाडीचेही योगदान लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुकीत आहे मात्र यांचाही विसर जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांना पडला असून माझ्यापेक्षा पक्षात कोणी मोठा नाही अशीच भावना या जिल्हाध्यक्षांची झाली मोठ्या हिमतीने जिल्ह्यातील नेत्यांनी लोकसभेचा विधानसभा जिंकली आहे मात्र पुन्हा बालेकिल्ला राष्ट्रवादीचा करायचा नसेल तर जिल्हाध्यक्षांना वरिष्ठांनी समज द्यावी अशी अपेक्षा भाजपचेच पदाधिकारी करत आहेत

Adv