भारतीय जनता पार्टीने आज पहिली यादी जाहीर केली असली तरी येणाऱ्या दुसऱ्या यादीमध्ये कराड उत्तरचे भाजपचे उत्तराअधिकारी म्हणून मनोज घोरपडे यांच्याच नावावर शिक्का मोर्तब झाले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे
भाजपने आज आपल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील तीन उमेदवारांचा समावेश होता सर्वांचे लक्ष लागले होते ते कराड उत्तर विधानसभा मतदार संघाकडे भाजपाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मानणारा हा मतदारसंघ असून याच मतदार संघातून या दोन्हीही नेत्यांनी कराड उत्तरचे उत्तर अधिकारी म्हणून मनोज घोरपडे यांच्याच नावाला पसंती दिली आहे येत्या दोन-तीन दिवसात अधिकृत घोषणा होणार असल्याचे समजते
कराड उत्तर या विधानसभा मतदारसंघात तुतारी या चिन्हावर विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील हेच उमेदवार असल्याने या मतदारसंघात तुतारी विरुद्ध कमळ अशी थेट लढत होणार आहे