सातारा शहरातील गोडोली परिसरातील सर्वे नं ६९, गोडोली वनविभाग नर्सरी शेजारी सौभाग्य मंगल कार्यालयाचे विरुद्ध बाजूस मुख्य रस्त्या लागत शासनाचे सुमारे ५ गुंठे जागेत पत्र्याचे शेड मारून काही अतिक्रमण धारकांनी हेतू पररस्परअतिक्रमण केले आहे. सदर जागा महाराष्ट्र शासनाने दिली असल्याचे भासवून गेली काही वर्ष अतिक्रमण धारक तिथे अतिक्रमण करून त्या सरकारी जागेचा वापर वयैक्तिक हितासाठी करत आहे.
या जागेचा ते कोणत्या हि प्रकारचा सरकारी महसूल भरत नाहीत.सदर अतिक्रमित जागा वनविभाग सातारा यांचे अखत्यारीत येत नसलेने या अतिक्रमण संदर्भात सामाजिक कार्यकर्ते किरण खरात यांनी उपअभियंता बांधकाम विभाग सातारा यांचे कडे या अतिक्रमण बाबत लेखी तक्रार केली होती. याची दाखल घेऊन उपअभियंता बांधकाम पोवई नाका सातारा यांनी संबंधित अतिक्रमण धारकास नोटीस बजावत गोडोली येथील ते अतिक्रमण खाली करणेचे निर्देश दिले आहेत.
विद्युत बोर्ड सुद्धा अश्या अतिक्रमण धारकांना कशी वीज पुरवतात हा सुद्धा कळीचा मुद्दा बनला आहे . या संपूर्ण प्रकाराबाबत ठोस कारवाई होई पर्यंत पाठपुरावा करणार असलेचे किरण खरात यांनी सांगिलते आहे.