विभागीय आयुक्त यांचे सर्व जिल्हाधिकारी यांना आदेश
झालेल्या
पुणे दि. ०५/ अवकाळी आणि अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईचा आढावा बैठक विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी काल दि. ०४ नोव्हेंबर रोजी घेतली होती. यात जुलै-ऑगस्ट २०१९ च्या नुकसानीचे ८० टक्के अनुदान वाटप झाले असल्याचे समोर आले आहे. तर ऑक्टोबर, २०१९ मधील अनुदान लवकरच वाटप करण्यात यावे असे निर्देश देखील ना.डॉ.गोऱ्हे यांनी प्रशासनास दिले आहे.
तसेच या अवकाळी आणि अवेळी पावसामुळे शेतीचे जमिनीचे आणि शेतीच्या बांधाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असल्याची बाब ना.डॉ.गोऱ्हे यांच्या निदर्शनास आल्यानंतर तात्काळ हे काम शेतीच्या जमिनीचे आणि बंधाची कामे मनरेगा मधून करण्यात यावे यासाठी ना.डॉ.गोऱ्हे यांनी विभागीय आयुक्त यांना निर्देश दिले.
अवकाळी आणि अवेळी पावसाने वाहून गेलेले शेतीतील
◆ समपातळी बांध,
◆ दगडी बांध,
◆ शेळ्यांचा गोठा,
◆ माती नाला बांध,
◆ कुक्कुट पालनासाठी शेड,
◆ शेत बांध बंदिस्त यासह एकूण १९ कामे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी तात्काळ पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून कृषि विकासाची सार्वजनिक व वैयक्तिक स्वरूपाची कामे घेण्याची आदेश केले आहेत.
तसेच संबंधित शेतकऱ्यांचे जॉब कार्ड नसल्यास विहित पद्धतीने नवीन जॉब कार्ड काढण्याची कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. याबद्दल ना.डॉ.गोऱ्हे व विभागीय आयुक्त यांचे आभार पुणे शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, सांगली माजी जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, राम गावडे, स्वप्नील कुंजीर, स्वाती ढमाले, सोलापूर अस्मिता गायकवाड यांच्यासह शेतकरी यांनी मानले आहेत.