सध्या जागतिक स्तरावर कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव गेल्या सहा-सात महिन्यापासून सुरु आहे. सातारा जिल्हयातही कोरोनाने थैमान घातले आहे. अद्यापपर्यंत कोणती लस किंवा प्रभावी गुणकारी औषध मिळालेले नाही, या पार्श्वभुमीवर प्रतिवर्षीप्रमाणे, रविवार दिनांक २५ आक्टोबर २०२० रोजी राजघराण्याचा होणारा विजयादशमीचा शाही सिमोल्लंघन सोहळा योग्य ते सामजिक अंतर राखुन आयोजित करण्यामधील
धोका लक्षात घेवून खा श्री छ उदयनराजे भोसले यांनी रद्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी अशी माहीती जलमंदिर पॅलेस,सातारा येथुन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जनसंपर्क कार्यालयातुन एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
शिवप्रभु छत्रपतींच्या राजगादीची विजयादशमी चे दिवशी सिमोल्लंघनाची पूर्वापार चालत आलेली परंपरा, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जितक्याच तोलामोलाने पुढे चालु ठेवली आहे. हा शाही सिमोल्लंघन सोहळा सातारकर आणि सर्वसामान्य जनतेचा मोठा उत्सव ठरला आहे. यावेळी विधीवत श्री भवानी तलवारीचे पूजन जलमंदिर पॅलेस येथे झाल्यावर या ऐतिहासिक तलवारीची जलमंदिर ते पोवईनाका अशी पालखीतुन मिरवणुक काढण्यात येवून, पोवईनाका येथे सिमोल्लंघनाचे विधीवत पूजन करण्यात येते. पूजन झाल्यावर परत ही पालखी जलमंदिर पॅलेस येथे आल्यावर पूजा-अर्चा झाल्यावर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि राजघराण्यातील सर्व सन्माननीय सदस्य हे समस्त सातारकरांच्या आपटयाच्या पानांचा स्विकार करतात आणि त्यानंतर समस्त सातारकर नागरीक एकमेकांना सोने लुटतात अशी ऐतिहासिक परंपरा लाभलेला हा सोहळा मोठया उत्साहात आणि प्रथा-परंपरेप्रमाणे साजरा केला जात असतो. हा एक जनतेचा उत्सव असतो. तथापि यंदाच्या कोरोनाच्या भीषण परिस्थित कोणताही धोका पत्करणे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना आवश्यक वाटत नसल्याने, यंदाचा रविवार दिनांक २५/१०/२०२० रोजी होणारा विजयादशमी शाही सिमोल्लंघन सोहळा रदद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .
सर्व संबधीतांसह खा श्री छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर प्रेम,निष्ठा असणा-या हितचिंतक,कार्यकर्ते,नागरीक,जेष्ठ व्यक्ती आदी सर्वांनी नोंद घेवून सहकार्य करावे असे विनंती आवाहन जलमंदिरपॅलेस येथुन देण्यात आलेल्या प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.