प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गंत गरजवंत पात्र लाभार्थ्यांना जास्तीत जास्त सदनिकांचा /घरकुलांचा लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्रासह सातारा जिल्हयाला असलेले उदिष्ट वाढवून देण्यात यावे अशी आग्रही मागणी देशाचे ग्रामिण विकास मंत्री ना.शिवराजसिंह चौहान यांचेकडे आम्ही केली होती. त्यानुसार प्रधानमंत्री आवास योजनेचे सर्वांत जास्त उदिष्ट महाराष्ट्र राज्याला देण्यात आले आहे. तर सातारा जिल्हयालाही 45422 घरांचे उदिष्ट मिळाले आहे. प्रशासनाने वाढीव उदिष्टपूर्तीकरीता विशेष प्रयत्न करुन सदनिका किंवा घरांपासून कोणीही पात्र लाभार्थी वंचित राहु नये यासाठी नियोजनबध्द प्रयत्न करावे अशी माहीती वजा सूचना आज जिल्हा प्रशासनाला केली आहे.
अन्न,वस्त्र,निवारा या मुलभुत गरजांचा विचार करता, गेल्या 75-80 वर्षापासून अजुनही कित्येक कुटुंबांना स्वत:चे हक्काचे घर नाही. याकरीताच देशाचे पंतप्रधान मा. ना.नरेंद्र मोदी यांनी गरीब, वंचित आणि गरजवंत कुटुंबांसाठी प्रधानमंत्री आवास योजना गेल्या काही वर्षापासून लागु केली आहे. हक्काची निवास व्यवस्था सर्वांना मिळाली पाहीजे हा मुख्य हेतु आहे. ज्यांची परिस्थिती आहे ते जागा-घर-सदनिका घेवू शकतात परंतु ज्यांची परिस्थिती नाही त्यांना राष्ट्रीयकृत बॅन्कांकडून कर्ज घेवून, केंद्राची सुमारे 2 लाख 50 हजार रुपयांचे विनापरतावा अनुदान आणि काही लाभार्थींचा हिस्सा अशी सांगड घालुन, केंद्राची प्रधानमंत्री आवास योजना नागरी क्षेत्रात नगरपालिका आणि ग्रामिण क्षेत्रात पंचायत समिती मार्फत राबविणेत येत आहे.
या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून, हजारो लोकांचे स्वत:च्या घराचे स्वप्न साकार होत आहे, झाले आहे.
या सर्व बाबींचा विचार करुन, या योजनेचे उदिष्ट वाढविल्यास, याचा लाभ अधिक कुटुंबांना होणार असल्याने, सदर योजनेचे महाराष्ट्र राज्याच्या आणि विशेष करुन सातारा जिल्हयाचे उदिष्टात वाढ करणेबाबत आम्ही नुकतीच केंद्रीय ग्रामिण विकास मंत्री ना. शिवराजसिंह चौहान यांना विनंती केली होती.
राज्यातही महायुतीचे सरकार आणि केंद्रातही भाजपा आघाडीचे सरकार असल्याने, आमच्या मागणी बळकटी मिळाल्याने, केंद्रीय मंत्री ना.शिवराजसिंह चौहान यांनी महाराष्ट्राला सन 2025-26 चे उदिष्टामध्ये वाढ केली आहे. त्याचा लाभ सातारा जिल्हयालाही मिळाला असून, गेल्या १० वर्षाातील उच्चांकी म्हणजेच 45422 घरांचे उदिष्ट मिळाले आहे.
वाढीव उदिष्टामुळे सातारा जिल्हयातील पात्र गरजु कुटुंबे, स्वत:च्या हक्काच्या घरापासून वंचित राहणार नाहीत अशी अपेक्षा आहे. याकरीता सातारा जिल्हयातील संबंधीत प्रशासनाने तसेच मा.मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मा.जिल्हाधिकारी यांनी या योजनेचा नियमित आढावा घेवून, पात्र लाभार्थींची निवड करण्यासाठी विशेष प्रयत्न करुन, योजनेचा लाभ जास्तीत जास्त कुटुंबापर्यंत पोहोचवणेचे कालबध्द नियोजन करावे अशी सूचनाही प्रशासनाला केली आहे.






