सातारा,(प्रतिनिधी) : निष्णात वकील व समाजप्रिय व्यक्तिमत्त्व असलेले ॲड. निलेश सुरेश तपासे (वय ५२) यांचे आज मंगळवारी सकाळी अल्प आजाराने निधन झाले. मल्हार पेठ, सातारा येथील रहिवासी असलेले ॲड. तपासे हे त्यांच्या कर्तृत्वासाठी सातारा परिसरात ओळखले जात होते. त्यांच्या जाण्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात आई, वडील, बहिण, दोन भाऊ, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. झी २४ तासचे पत्रकार तुषार तपासे यांचे ते मोठे बंधू होते.
तपासे कुटुंबीयांवर या दुर्दैवी घटनेमुळे दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ॲड. निलेश तपासे यांच्या आकस्मिक जाण्याने कायदा क्षेत्रातही पोकळी निर्माण झाली असून सहकाऱ्यांसह सातारा परिसरातील नागरिकांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.