राजकुमारी सोनिया पाटील यांना लंडन विद्यापीठाची पदवी

409
Adv

राजघराण्याचा वारसा जपतानाच उच्च शिक्षणाची शिदोरी घेवून राजकुमारी सोनिया पाटील यांनी राजघराण्याच्या लौकिकात भर घालत युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट लंडन या विद्यापीठाची बॅचलर ऑफ आर्ट इन प्रॅक्टिकल फिल्म मेकिंग ही मानद पदवी संपादन केली आहे. सोनिया पाटील या सातार्‍याच्या राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले यांची नात, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या भाची आहेत.

परदेशातील उच्च विद्या विभूषित पदवी संपादन करणार्‍या सोनिया पाटील या महाराष्ट्रातील पहिल्या विद्यार्थिनी ठरल्या आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट लंडन विद्यापीठात प्रवेश घेतल्यानंतर सोनिया पाटील यांनी सलग 3 वर्षे लंडन येथे विद्यापीठाच्या नियमानुसार सर्व परीक्षा आणि अभ्यासक्रम पूर्ण करून मानद पदवी संपादन केली.

भारतामध्ये तथा महाराष्ट्रामध्ये डिप्लोमा किंवा डिग्री मिळवण्याची शिक्षण पद्धती आणि लंडन येथे डिप्लोमा आणि डिग्री मिळवण्याची शिक्षण पद्धती यामध्ये फार मोठी तफावत आहे. पदवीधर आणि डिप्लोमा याची गुणांकन पद्धती वेगळी आहे. तरीही सोनिया पाटील यांनी ही मानद डिग्री संपादन केली आहे.

लंडन येथील या विद्यापीठाच्या एका भव्य कार्यक्रमांमध्ये ही मानद पदवी त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. सोनिया पाटील यांच्यापूर्वी त्यांच्याच घराण्यातील राजकुमार यशराज पाटील यांनी देखील परदेशात उच्च शिक्षण घेतले आहे. आता सोनिया पाटील यांनी या लौकिकात भरच घातली आहे. या पदवीशिवाय टोकिओ व लंडन येथील इंटर नॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्येही सोनिया पाटील यांना अ‍ॅवॉर्डस् मिळाले आहे.

सोनिया पाटील यांना राजमाता कल्पनाराजे भोसले, खा. उदयनराजे भोसले, मातोश्री मनीषाराजे पाटील आणि पिताश्री श्रीमंत धनंजय पाटील, धीरज लोखंडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या उज्वल यशाबद्दल राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

Adv