शालेय गणवेशातून गांधीटोपी झाली गायब

56
Adv

पूर्वीच्या काळापासून गोपाळांची शाळेत जायची तयारी सुरु व्हायची ती गांधीटोपी पांढरा सदरा व खाकी हाफ पँट घालून त्यासोबत खापराची दगडी पाटी किंवा राजा पाटी त्यासोबत पेन्सिल्नचा तुकडा व कापडाची घेतलेली पिशची खांद्यावर टाकून स्वारी शाळला तयार,पण
आधुनिकतेवर स्वार झालेल्या नव्या पिढीकडे मुलांच्या गळ्यात अडकवायला फॅन्सी टाय आली अन्
डोक्यावरची गांधी टोपी मात्र हरवली,

संगणकाच्या आणि भ्रमणध्वनीतील गेम्सच्या नादात “आई माझ पत्र हरवल ते
मला सापडल ? म्हणत जस बालपण हरवून गेल तस पत्र अणि डोक्यावची टोपी दोन्ही सापडेणाश्याव
झाल्या, शाळेमध्ये इयत्ता पहिलीपासून दहावीपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यांच्या डोक्यावर नियमित असणारी
उन्हा-तान्हानुन संरक्षण करणारी खादीची गांधीटोपी शालेय गणवेशातून हद्दपार झालेलीदिसून येते.
नव्या शिक्षण पध्दतीत इंग्रजी माध्यामांच्या शाळांना अवास्तव महत्त्व मिळाल्याने पालक वर्ग आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतात त्यांना ठरवून दिलेले

खिशाला न परवडणारे दोन – चार गणवेश हि घेतात शाळेचा वेगळा.पी.टी.चा वेगळा ,स्काऊटचा
वेगळाच आणि आणखी काही विशेष दिवसांचे वेगळे गणवेश असतात. चिमुकल्यांना पायमोजे अन् न पेलाणारे शूज घालूनकोट टाय चा सुरेख पेहराव करुन पाठीला न झेपणारे दप्तराचे ओझे घेऊन शाळेला पाठवण्याचा नवापायंडा रुजला पण डोक्याची शोभा अन सम्मान वाढवणारी गांधी टोपी कुणाच्या ध्यानीमनी राहिलीनाहीगेल्या दहा-पंधरा वर्षामध्ये शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र असे बदल घडूनआले फक्त शहरात असणाच्या इंग्रजी माध्यमंच्या शाळा गावा-गाव उभ्या राहिल्या त्यातून आपल्यामुलाल हि इंग्रजी शिक्षणाचे धडे मिळावेत व ते मागे राहू नये म्हणून मुलाचा कल न पाहता फक्तअट्टाहास म्हणून पालक त्याला इंग्रजी शाळत घालतात पूर्वी गावागावत मराठी माध्यमाच्या सर्वांना
समान वागणूक देणा या आणि मुल्य संवंधनासाठी प्रयत्नशील असणाऱ्या शाळा आता ओस पडू लागल्या आहेत.

प्रत्येकपालकाला परवडेल असा साधासुधा पण सुरेख गणवेश पूर्वी होता परंतु आता मराठी शाळांमध्ये येणाऱ्या काहीपालकांच्या व जून्या जमान्यातल्या सेवानिवृत्तीला आलेल्या किंवा सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांच्याडॉक्यातच फक्त टोपी आजही दिसते
आजव्या जमान्यात शालेय गणवेशातील टोपी दुकानात मिळणेहीदुरापासूत झाले आहे बाजारातूनच जर गांधी टोपी हद्दपार झाली तर बिचा-या मुलांना तरी ती कशी
पहाबयास मिळणार टाय,ब्लेझर्स ची क्रेझ आता शालेय गणवेशात आली आहे त्यामुळे उद्या मुलांनी
पालकांना टोपी असते तरी कशी असे विचारल्यास वाबगे ठरणार नाही.

कोट – प्राथमिक व माधयमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पूर्वी डोक्यावर टोपी घालणे बंधणकार होते
शालेय गणवेशाचा अविभाजूय भाग म्हणून टोपीची एक वेगळी ओळख होती विद्यार्थ्याध्ये ऐक्य व
समानतेचे प्रतिक म्हणून शालेय गणवेश महत्तवाची भूमिका पार पाडत असतो, गरीब-श्रीमंत असा
कोणताच भेद गणवेश होऊ देत नाही.
———————————————-
पूर्वीच्या काळी पहिल्या दिवशी शाळेत जाताना पाटीवरच्या श्री गणेशाला जितके महतूतव
होते तितकेच डोक्यावरच्या टोपीला हि होते टोपी म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या एकात्मतेचे जणू प्रतिक
होते.गांधी ,नेहरु व लाल बहादुर शास्त्री नेहमी डोक्यावर गांधी टोपी घालत असत.

Adv