वाशिम जिल्हा करोनाबाबत ग्रीन झोनमध्ये राहण्यासाठी प्रयत्नशील : ना. देसाई

75
Adv

वाशिम जिल्हा ग्रीनझोनमध्ये असून तो तसाच कायम राहील याकरीता अतिशय चांगले नियोजन वाशिम जिल्हा प्रशासनाला बरोबर घेवून आम्ही केले आहे. वाशिम जिल्हा प्रशासनाच्या नियोजनबध्द कामकाजामुळेच हे सर्व शक्‍य झाले आहे. वाशिम जिल्हयातील परराज्यात, परजिल्हयात अडकलेल्या मजुरांना परत आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. परत आलेल्या मजुरांची काळजी घ्या. विलगीकरण कक्षात त्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्या, असे आदेश पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी वाशिम जिल्हयातील अधिकाऱ्यांना दिले.

करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ना. शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत ते बोलत होते. वाशिमवरुन खा. भावना गवळी, आ. राजेंद्र पाटणी, आ. अमित झनक, जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर सहभागी झाले होते.

खा. भावना गवळी यांनी जिल्ह्यातील काही मजूर इतर राज्यात अडकलेले आहेत.त्यांना जिल्ह्यात परत येण्यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक असल्याचे सांगितले. ना. देसाई यांनी परजिल्हयात अडकलेल्या मजुरांना आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. मात्र, त्यांची गैरसोय होऊ देऊ नका असे सांगितले.

Adv