भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तीन वर्षासाठीची राज्याची कार्यकारीणी जाहीर केली आहे. या कार्यकारणीत खासदार श्री छ उदयनराजे भोसले यांना प्रदेश कार्यकारणीत विशेष निमंत्रित सदस्य करण्यात आले आहे.
प्रदेश उपाध्यक्षामध्ये तीन महिलांना स्थान आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या चित्रा वाघ यांना प्रदेश उपाध्यक्ष पद देण्यात आलं आहे. तर पंकजा मुंडे यांना कार्यकारीणीत स्थान दिलं नसलं तरी बीड मधून प्रितम मुंडे यांना प्रदेश उपाध्यक्ष पद देण्यात आलं आहे. तर नाशिकमधून डॉ. भारती पवार यांना स्थान देण्यात आलं आहे.
भाजपचे मुख्य प्रवक्ते पद साभाळलेल्या माधव भंडारी यांना आता प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. तर मुख्य प्रवक्ते पद आता केशव उपाध्ये यांच्याकडे देण्यात आले आहे.
भाजपने राज्य कार्यकारिणीत विशेष निमंत्रित सदस्यपदी निवड करून पुन्हा एकदा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा सन्मान केला आहे खासदार श्रीमंत छत्रपती भोसले यांच्या निवडीने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे