डबेवाडी तालुका सातारा गावचे हददीत डॉल्बी सिस्टिम वाजत असुन ट्रफिक जाम झाले आहे तसेच मोठया आवाजात डॉल्बी सिस्टिम चालु असुन लोकांना त्रास होत असल्याची माहिती नियंत्रण कक्ष सातारा यांना प्राप्त झालेवर वरिष्ठांनी दिले सुचनेप्रमाणे डीबी पथकाने सदर ठिकाणी जावुन पाहणी करुन पडताळणी केली असता दोन गणपती मंडळाच्या डॉल्बी सिस्टिम सह मोठमोठया कर्कश आवाजात मिरवणुक चालु होत्या व सार्वजनिक रस्त्यावर ट्रफिक जाम झाले होते. त्या अनुषंगाने मंडळ अध्यक्ष डॉल्बी मालक व ट्रॅक्टर चालक यांचेवर गुन्हे दाखल केले असुन सिस्टिमसह गाडया जप्त करणेची कारवाई चालु आहे.
आझाद हिंद सांस्कृतिक मंडऴ डबेवाडी अध्यक्ष दर्शन दयानंद माने
डॉल्बी मालक प्रतिक सुनिल माने,
ट्रँक्टर चालक अनिकेत संजय माने
ट्रँक्टर क्रमांक MH-11-CH-3031
काऴेश्वरी प्रतिष्ठान अध्यक्ष कुलदीप धर्मेद्र माने
डॉल्बी टँम्पो मालक मयुरेश मंगेश मोरे यांचे टँम्पो क्रमांक MH-04-FU-5857.. या दोन मंडळावर कारवाई झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे
पोलीस निरीक्षक निलेश तांबे सातारा तालुका पोलीस ठाणे यांनी असे अहवान केले आहे की गणेश उत्सवात मिरवणुका या पारंपारिक वादयांसह परवानगीसह काढणेत याव्यात विना परवाना डॉल्बी सिस्टिम लावल्यास कडक कारवाईकरणेत येईल
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक साो, सातारा,श्री तुषार दोशी साो, मा.अपर पोलीस अधीक्षक साो, सातारा,
श्रीमती वैशाली कडुकर, मा. उपविभागीय अधिकारी सातारा विभाग, सातारा श्री राजीव नवले, सातारा तालुका पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री निलेश तांबे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, श्री. विनोद नेवसे,पोहवा राजु शिखरे, पोहवा मनोज गायकवाड, पोहवा पंकज ढाणे, पोहवा दादा स्वामी, पोहवा किरण निकम, पोहवा प्रदिप मोहिते, पोकॉ संदिप पांडव, पोकॉ शंकर गायकवाड यांनी केलेली आहे.