पाऊसाने झालेले नुकसान पाहण्यासाठी प्रशासनाला घेऊन उपनगराध्यक्ष शेंडे ऑन फील्डवर

220
Adv

सातारा- गेल्या दोन दिवसांपासून पावसाने सातारा जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. त्याचा फटका शहर व उपनगरालाही बसला आहे.ओढे,नाले तुडुब भरल्याने शहरातील अनेक वस्त्या व कॉलनीतील घरांमध्ये पाणी घुसले आहे.दरम्यान सातारा नगरपलिकेचे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी काल मध्यरात्री पासूनच प्रशासनाला सोबत घेऊन नागरिकांच्या मदतीसाठी धावले आहेत.शहरातील ठीक ठिकाणी जेसीबी लावून तुंबलेले ओढे,नाल्यांचा मार्ग मोकळा करुन पाणी प्रवाहीत झाल्यामुळे तेथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यांत गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी जिवीत व वित्तहानी झाल्याच्याही घटना समोर आल्या आहेत.

सतत पडणार्या पावसाचा फटका शहराला व उपनगराला ही बसला असून राधिका रोड,गोडोली,पिरवाडी,माने वस्ती,जानकर वस्ती, येथील घरा-घरात ओढ्या,नाल्याचे पाणी घुसले आहे. बुधवार पेठ येथेही पाण्याची पाईपलाईन फुटल्याने नागरिकांचे हाल झाले  आहे.तसेच सैनिक स्कूलची भिंत पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यामुळे परिसरातल्या भागात पाणी शिरले होते.या सर्व घटनेची माहिती समोर येताच सातारा पालिकेचे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट व नगरअभियंता दिलीप चिद्रे यांना सोबत घेऊन या सर्व भागात जावून नुकसानीची पाहणी करुन या भागात  तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याने ठीक ठिकाणी ५ जेसीबी व टिपर लावून ओढ्या,नाल्यातील व  घरा घरात घूसलेला गाळ उपसून काढुन मार्ग मोकळा करुन दिला

आहे. मनोज शेंडे यांनी लवकरात लवकर उपाययोजना केल्यामुळे शहरात व उपनगरातील नागरिकांची गैरसोय टळली असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.सातार्याच्या सद्य परिस्थितीवर नगरपालिका लक्ष ठेऊन असुन नागरिकांच्या काही अडचणी असतील तर त्यांनी तत्काळ नगरपलिकेशी संपर्क साधावा असे आवाहनही उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी केले आहे.

चौकट- 
उपनगराध्यक्ष काल रात्री पासूनच ऑन फिल्डवर…

  पावसामुळे सातार्यात अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान उपनगराध्यक्ष मनोज शेंडे हे काल रात्री पासूनच शहरात व उपनगरात स्वतः जाऊन नागरिकांना दिलासा द्याचे काम करत होते. संगममाहुली येथील कैलास स्मशानभूमीत पुराचे पाणी शिरल्याने शहरातील अंत्यसंस्कार ला अडचणी निर्माण झाल्या होत्या.मनोज शेंडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तसेच पर्यायी व्यवस्था बाबत माहिती घेत  नातेवाईकांना अंत्यसंस्कारावेळी काही अडचणी निर्माण होणार नाही याची काळजी घेतली. 

Adv