उत्तरप्रदेशच्या कासगंजमध्ये मोठी दुर्घटना घडली. भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली तलावात उलटून सात मुलांसह २० जणांचा मृत्यू झाला असून ही संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा ट्रॅक्टर नियंत्रणाबाहेर जाऊन तलावात पडला. स्थानिक लोकांनी प्रशासनाच्या मदतीने शोध सुरू केलाय. सुमारे तीन तास शोध घेतल्यानंतरही तिघांचा शोध लागला नाही. गोताखोर तलावात शोध घेत आहेत.
जखमींना कासगंज जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जैथरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागला कासा गावातील सुमारे ४५ लोक शनिवारी सकाळी ट्रॅक्टर ट्रॉलीतून गंगेत स्नान करण्यासाठी गेले होते. 9.30 च्या सुमारास ट्रॅक्टर गावातून निघाला होता. रात्री साडेदहाच्या सुमारास पटियाली परिसरातील दरियावगंज गावाबाहेर पोलीस ठाण्याजवळ पोहोचले.






