शुक्रवार पेठेतील गटारावर बांधकाम साहित्य टाकून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना अखेर माघार घ्यावी लागली. ‘सातारानामा’ने हा गंभीर प्रकार उघडकीस आणत सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर बिल्डरने गटारावरील साहित्य हटवले.
भाजप नेत्यांच्या प्रभागातील दुर्लक्षित राहिलेला प्रश्न अखेर मार्गी लागला असून तुंबलेले गटार उघडण्यात आले आहे. नव्याने पाईपलाईन टाकण्याचे कामही सुरू झाले आहे.
प्रश्न उपस्थित होताच प्रशासनाची यंत्रणा खडबडून जागी झाली. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नावर झालेली ही कारवाई म्हणजे लोकहितासाठी पत्रकारितेच्या पाठपुराव्याचा विजय असल्याची भावना परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.
बांधकाम साहित्यामुळे सांडपाण्याचा निचरा अडल्याने परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सातारानामाने वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत आरोग्य विभागाने संबंधित ठिकाणी पाहणी करून गटारातील अडथळे हटविण्याचे आदेश दिले.
‘सातारानामा’ लोकहितासाठी आवाज उठवत राहणार, आणि नागरिकांच्या प्रश्नांवर प्रशासनाला जाब विचारत राहणार!






