Friday, September 25, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City शाहूपुरी चौकातील अतिक्रमण कधी निघणार?

शाहूपुरी चौकातील अतिक्रमण कधी निघणार?

773
Adv

शाहूपुरीतील अतिक्रमणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना आता या कारभारामागे नेमके कोणाचे पाठबळ आहे, याची चर्चा शाहूपुरीपासून थेट सातारा पालिकेपर्यंत रंगू लागली आहे. शाहूपुरीचा कारभार आता ‘लिंब’मधून चालतोय का? असा थेट सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

शाहूपुरी चौकातील अतिक्रमणांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असतानाही संबंधितांवर ठोस कारवाई का होत नाही? काही अतिक्रमणांकडे पालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतेय का? असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.

विशेष म्हणजे पांढऱ्या ड्रेसमधील ‘साहेब’ नामक व्यक्तीचा शाहूपुरीतील अतिक्रमणाला वरदहस्त असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. ही व्यक्ती नेमकी कोण? तिचा पालिकेतील कोणत्या अधिकाऱ्यांशी किंवा पदाधिकाऱ्यांशी संबंध आहे? आणि लिंब परिसरातून सातारा पालिकेच्या कारभारात नेमक्या कोणत्या ‘उचापती’ सुरू आहेत? याची चौकशी होणे गरजेचे आहे.
अतिक्रमणधारकांवर हातोडा कधी?
पालिका प्रशासनाकडून शहरातील अतिक्रमणांवर कारवाईचे दावे केले जात असले, तरी शाहूपुरी चौकातील अतिक्रमणांकडे मात्र कारवाईचा हातोडा का पोहोचत नाही, हा मोठा प्रश्न आहे.
शाहूपुरी चौकातील अतिक्रमण कधी निघणार?
‘साहेबां’चा वरदहस्त असेल तर कारवाई थांबणार का?
आणि पालिकेचा कारभार नेमका साताऱ्यातून चालतोय की ‘लिंब’मधून?

या प्रश्नांची उत्तरे आता सातारा पालिका प्रशासनाने जनतेसमोर स्पष्ट करण्याची वेळ आली आहे. दहा तारखेपर्यंत अतिक्रमण काढण्यास न्यायालयाची परवानगी नसून काय न्यायालय जो निकाल देईल तो सर्वमान्य असेलच तोपर्यंत तरी अतिक्रमणाला कायम पाठिंबा देणारा साहेब कोण अशी चर्चा सध्या रंगात आहे

Adv