
नुकताच त्रिशंकू भागातील शाहूनगर, रामराव पवार नगर जगतापवाडी हा परिसर नगरपालिकेत समाविष्ट झाला आहे या हद्दवाढ भागातील अनेक नागरी सुविधांसाठी जय सोशल फाउंडेशन कार्य करत आहेत या भागामध्ये अनेक कॉलनी मध्ये रस्ते उखडलेले आहेत गटारे रस्त्यावर वाहताहेत पथदिव्यांची सोय नाही काही कॉलनीं मध्ये पाणी पुरेसे येत नाही स्वच्छतेसाठी जय सोशल फाउंडेशन चे सदस्य दररोज एखादा परिसर स्वच्छ करण्याचे काम करत आहे मात्र या भागातील काही अति महत्वाच्या सुविधा साठी शाहूनगर भागातील नागरिक आपल्या समस्या घेऊन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे गेले असता उदयनराजेंनी सर्व समस्या ऐकून घेतल्या व मी प्रत्यक्षात येऊन पाहणी करतो व या समस्या नक्कीच सोडवितो फक्त अति महत्त्वाच्या समस्या अगोदर हाती घेऊ व त्यानंतर इतर समस्या ही नक्की सोडवू असे सांगितले आणि समस्या नाही सोडवल्या तर मला बोला असे दणदणीत उत्तर देऊन शाहूनगर वासियांना दिलासा दिला. याप्रसंगी 58 कोटी निधी आणल्याबद्दल श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांचे पुष्पगुच्छ देऊन शाहूनगर वासियांनी आभार मानले.
जगताप वाडी येथील मारुती मंदिर ते रामराव पवार नगर कडे जाणाऱ्या रस्त्यालगत दोन्ही बाजूंना मोठी नाल्या स्वरूपात दरी निर्माण झाली आहे त्याचे काम, मंगळाई कॉलनीकडे जाणारा उताराचा रस्ता, अजिंक्य बाजार चौक ते युनायटेड वेस्टर्न कॉलनी दरम्यान असणारा मुख्य रस्ता, अनंत सोसायटीतील रस्ता, जगताप वाडीतील अंतर्गत रस्ते रामराव पवार नगर मधील अंतर्गत रस्ते, श्री व सौ अपार्टमेंटच्या मागील हीलटॉप सोसायटीचा रस्ता, शिवनेरी कॉलनी परिसरातील रस्ते तसेच शाहूनगर भागातील सर्व मुख्य रस्ते व अंतर्गत रस्ते लगत स्ट्रीट लाइट्स, अनेक भागातील उघडी गटारे या सर्व समस्यांबद्दल नागरिकांनी आपल्या व्यथा महाराजांसमोर मांडल्या यावेळी जय सोशल फाउंडेशन चे सदस्य तसेच बहुसंख्य शाहूनगर वासीय उपस्थित होते.
Home Politics|Satara District Satara City शाहूनगर भागातील प्रश्न नाही सोडवले तर मला बोला खा उदयनराजे भोसले





