Wednesday, April 22, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City सातारच्याकामांसाठी 14 कोटी 65 लाख रुपयांचा भरघोस निधी. . छ. उदयनराजे भोसले

सातारच्याकामांसाठी 14 कोटी 65 लाख रुपयांचा भरघोस निधी. . छ. उदयनराजे भोसले

610
Adv

सातारा नगरपरिषदेसाठी शासनाकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन,सातारा शहराचा समतोल सर्वकष विकास साधत विविधांगी सेवा-सुविधा सातारकरांना पुरवण्यावर,सातारा विकास आघाडीचा भर राहीला आहे.त्यानुसार जिल्हा नियोजन समिती मधुन एकूण 19 कामांना सुमारे 14 कोटी 65लाखरुपयांच्या विकास कामांना प्रशासकीयमंजूरी मिळालेली आहे अशी माहीती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
नागरिकांना विविध सेवा देताना,त्या कार्यक्षमपणे दिल्या जाव्यात तसेच त्या सुविधांवर होणारा खर्च हा जास्तीत जास्त शासन निधीमधुन मिळवून,त्याचा भार नागरिकांवर पडू नये म्हणून सातारा विकास आघाडीचे प्रयत्न आजपर्यंत राहीले आहेत. लोकनियुक्त प्रतिनिधी सध्या नसले तरी प्रशासनाच्या माध्यमातुन
कामे विविध मार्गानी मंजूर करण्याची भुमिका आमची नेहमीच राहीली आहे.नगरपरिषदेची प्रशासकीय इमारत विविधभागातील रस्ते,नवीन कास पाईपलाईन,कास धरण,भुयारी गटर योजना,ग्रेडसेपरेटर,कचरा संकलनाकरीता 14 वा वित्तआयोगातुन रक्कम उभी करणे,स्पर्धात्मक उपक्रमामधुन प्राप्त झालेल्या निधीचा विनियोग अश्या अनेक शासन योजनामधुन,लोकोपयोगी कामे आणि सातारकरांना चांगल्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहीला आहे.त्याचाच भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा प्रशासन अधिकारी यांना लोकोपयोगी काम सुचवून,त्यांच्या माध्यमातुन महाराष्ट्र नगरोथ्थान महाअभियानां तर्गत,भांडवली मत्तेच्या निर्मितीकरीता असलेल्या योजनेमधुन सातारा नगरपरिषदेच्या हद्दीतील एकूण 19 कामेसर्वसाधारण वार्षिक योजनेमध्ये सुचवण्यात आली होती.या कामांना प्रशासकीय मंजूरी देण्याचे अधिकारी जिल्हाधिकारी यांना असल्याने, या 19 कामांना तांत्रिक मान्यता मिळवून,रुपये सुमारे 14 कोटी 65 लाख इतक्या रक्कमेच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.सदरचा प्रस्ताव मंजूर करण्याबाबत आम्ही व्यक्तीश: जिल्हाधिकारी श्री. जितेंद्रसिंह डूडी यांना विनंती सूचना
केली होती. त्यानुसार खालील कामांना प्रशासकीय मजूरी मिळाली असून, निधी देखिल प्राप्त झाला आहे.

या 14 कोटी 65 लाख रुपयांच्या कामांकरीता कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून जिल्हा प्रशासन अधिकारी असणार आहेत. वरील काम लवकरच सुरु होण्याबाबतची योग्य ती कार्यवाही जिल्हा प्रशासन अधिकारी, सातारा तथा मुख्याधिकारी,सातारा नगरपरिषद यांच्या माध्यमातुन करण्यात येईल.कामे मंजूर करण्याबाबत जसा पाठपुरावा सातारा विकास आघाडीने केला आहे त्याच पध्दतीने सदरची कामे सुरु होवून पूर्णहोया बाबतचा पाठपुरावा आम्ही स्वतः लक्ष घालुन करणार आहोत असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शेवटी नमुद केले आहे.

Adv