Wednesday, April 22, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City साताऱ्यातील बाजीराव च्या विहरीला पोस्ट कार्डवर स्थान

साताऱ्यातील बाजीराव च्या विहरीला पोस्ट कार्डवर स्थान

683
Adv

जलमंदिर परिसरातील बाजीरावची विहिर या नावाने ओळखली जाणा-या पुरातन विहिरीचे छायाचित्र,राष्ट्रीय पोस्ट दिनाचे औचित्य साधुन, केंद्रसरकारच्या पोस्ट खात्याने पोस्टकार्डवर छापण्यास दिनांक 11/10/2023 पासून सुरुवात केली आहे. बाजीराव विहिरीचे छायाचित्र येथुन पुढे छापण्यात येणा-या पोस्टकार्डवर असणारअसल्याने, ही अत्यंत अभिमानास्पद आणि सातारच्या ऐतिहासिक दृष्टीकोनामधुन अतिशय सन्मानजन्य घटना आहे.एमआयटी स्कूल ऑफ आर्किटक्चर पुणे यांनी, रोहन काळे राजेश कानिक यांनी अनेकांच्या सहकार्याने,शास्त्रीय पध्दतीने अभ्यास करुन परिश्रमपूर्वक दिलेल्या योगदानाचे निश्चितच कौतुक आहे असे गौरवोद्गार खा छ उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रीया देताना व्यक्त केले आहेत.

सातारा शहर ऐतिहासिक शहर आहे.छत्रपती राजाराम महाराज यांनी स्वराज्याची राजधानी रायगडावरुन किल्ले अजिंक्यतारा येथे स्थापन केली. स्वराज्याची तिसरी राजधानी म्हणून असलेल्या किल्ले अजिंक्यतारा वरुनच छत्रपती शाहु महाराज यांच्या कार्यकाळात अटकेपार झेंडा फडकवला गेला. त्यांच्याच काळात सध्याच्या जलमंदिर पॅलेस चा भाग असणारी आणि बाजीराव विहिर म्हणून ओळखली जाणारी विहिर बांधण्यात आली होती. ही बाजीराव विहिर 100 फुट खोल आहे तर हीचा आकार श्री महादेवाचे पिंडीसारखा आकार आहे. या विहिरीस 9 कमानी आहेत.तसेच या विहिरीमध्ये छत्रपती शाहु महाराज यांचे दगडामध्ये राजचिन्हांसह शिल्प कोरण्यात आलेले आहे.या
विहिरीमध्ये आजही जिवंत पाण्याचे झरे आहेत.पूर्वी ज्यावेळी कास योजना किंवा खापरी योजना अस्तित्वात नव्हतीत्या वेळी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या याच बाजीराव विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरण्यात येत होते.भारतीय पोस्ट खात्यातर्फे भारतातील उल्लेखनिय स्टेपवेल्सचे निरिक्षण करुन, त्यातील बारव, बावडी, पुष्करणी,पोखरण,पायविहिर, घोडेबाव, पोखरबाव,अश्या वेगवेगळ्या स्टेपवेलमधुन राष्ट्रीय पोस्ट दिनानिमित्तमहाराष्ट्रातील आठ स्टेपवेलच्या छायाचित्राचा समावेश त्याच्या पुस्तिकेत करण्यात आला आहे. त्यामध्ये नाशिक,
अमरावती, पुणे सातारा या जिल्हयातील प्रत्येक एकास्टेपवेलचा समावेश आहे तर परभणी जिल्हयातील चार स्टेपवेलअश्या एकूण आठ स्टेपवेलचा समावेश यंदा होवू शकला आहे. त्यामध्ये सातारच्या बाजीराव विहिरीच्या छायाचित्रपोस्ट कार्डवर प्रसिध्द झाले आहे.

साताराच्या ऐतिहासिक दृष्टीकोनामधुन ही एक असामान्य आणि अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.सातारा शहराच्या दृष्टीनेही ही एकअभिमानास्पद बाब आहे.बाजीराव विहिरीचे छायाचित्र प्रसिध्द होण्याच्या संपूर्णप्रक्रीयेत महाराष्ट्र बारव संवर्धन समितिचे संस्थापक आणि समन्वयक रोहन काळे, राजेश कानिम, शैलेश करंदीकर,धनंजय अवसरे, हेमंत लंगडे, यांनी बहुमोल सहकार्य केले आहे.आदरणीय राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजेभोसले यांच्या मार्गदर्शनाखाली याच व्यक्तींच्या पुढाकाराने सातारा वारसा संवर्धन ग्रुप समितीच्या माध्यमातुन
बाजीराव विहिरीची स्वच्छता जपली जाते.त्याचप्रमाणे श्री शिवरात्रीच्या रात्री आणि श्री शिवजयंतीचे रात्रीविहिरीमधील पाय-या,कमानी आणि अन्यत्र ठिकाणी दिपोत्सव साजरा करण्यात येत असतो. विहिरीच्या पोस्ट कार्डवरील छाचाचित्राची प्रसिध्दी होणे ही निश्चितच प्रत्येक सातारकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शेवटी नमुद केले आहे.

Adv