Monday, April 20, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City शहरातील अवैद्य धंदे बंद करा…निलेश मोरे

शहरातील अवैद्य धंदे बंद करा…निलेश मोरे

339
Adv

सातारा शहर व परिसरात मोठ्या प्रेमात अवैद्य धंदे सुरू असून याला खतपाणी घातले जात आहे. अशा अवैद्य धंद्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या सातारा शहरप्रमुख निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रमुख तुषार दोषी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सातारा जिल्हा हा मराठ्याची राजधानी म्हणून ओळखले जातो. सर्वच क्षेत्रात सातारचे नाव अग्रेसर राहिले आहे. असे असताना सातारा शहर व परिसरात मटका, जुगार, चक्री, अवैद्य दारूविक्री अशा अवैद्य धं‌द्यांना ऊत आला आहे. याला पोलीस खात्यातील काहीजण खतपाणी घालत आहेत. याच्या व्यसनाधीन जाऊन अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. अनेक तरुण झटकीपट पैसे मिळत असल्याने याकडे वळू लागले आहेत.

त्यामुळे पुढील आठ दिवसात शहर व परिसरात सुरू असलेले अवैद्य धंदे बंद करावेत अन्यथा शिवसेना स्टाईलने स्वतः अवैध धं‌द्यांवर धाड टाकणार आहे. यात अवैद्य धंदा आढळल्यास संबंधित व्यक्ती व त्या परिसरात असणाऱ्या पोलीस अंमलदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावर पोलीस प्रमुख तुषार दोषी यांनी याबतची माहिती तात्काळ कळवा संबंधितांवर कारवाई करू असू आश्वासन दिले. यावेळी वैद्यकीय जिल्हाप्रमुख दीपक चव्हाण, शहर संघटक अमोल इंगोले, किरण कांबळे, उपशहरप्रमुख शुभम भिसे,अजिंक्य रजपूत, अनिकेत भिसे, प्रथमेश बाबर,तेजस जाधव आणि इतर शिवसैनिक उपस्थित होते.

Adv