कास धरण ते सातारा अश्या नवीन अतिरिक्त पाईपलाईन मंजूर

464
Adv

कासधरण ते सातारा शहर या सुमारे 27 किलोमिटर अंतराची, 900 एमएम व्यासाची अतिरिक्तपाणीपुरवठा करणारी नवीन पाईपलाईनच्या 87 कोटी 21 लाख रुपयांच्या प्रस्तावाला केंद्राच्या अमृत 2.0 या योजनेमधुन, प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे. कासधरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव सर्वप्रथम आम्हीच दिला.कास धरणाची उंची वाढवण्यात आली. कास धरणाचे श्रेय उदयनराजेंकडे जाते हे बघताना सांगताना ज्यांना
घशाशी येते आणि ज्यांना आमचे प्रस्ताव म्हणजे फोटोसेशन वाटते त्यांना बसलेली ही मोठी चपराक आहे अशा शब्दात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या सूचनेवरुन, नगरपरिषदेने कास धरण ते सातारा शहर अखेर नवीन पाईपलाईलच्या कामाच्या 87 कोटी 21 लाखांचा प्रस्ताव केंद्राकडे सादर केला होता. या प्रस्तावाला केंद्राने प्रशासकीय मंजूरी प्रदान केली आहे, त्यावर प्रतिक्रीया व्यक्त करताना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात नमुद केले आहे की,कास धरणाची उंची वाढवल्यास, गुरुत्वाकर्षण पध्दतीने बिनखर्चाचे मुबलक पाणी सातारा शहराला मिळेल म्हणून आम्ही सर्वप्रथम कास धरणाची उंची वाढवण्याचे काम प्रस्तावित केले. त्यानुसार कास धरणाची उंची वाढवण्याच्या कामास वन विभाग, पर्यावरण विभाग, ग्रीन ट्रॅब्यूनल अश्या बहुतांशी केंद्रीय खात्यांशी निगडीत विभागांच्या तसेच युनेस्को इत्यादींच्या जिकीरीच्या असणा-या मंजू-या मिळवण्यात येवून, कास धरणाची उंची वाढवण्याचे कामास सुरुवात करण्यात आली. सदरचे उंची वाढवण्याचे काम देखिल आजमितीला जवळजवळ पूर्ण झाले आहे.पूर्वीची कास धरणातील पाण्याची साठवण क्षमता 0.1 टिएमसी इतकी होती ती आता उंची वाढवल्याने
0.5 टिएमसी इतकी झाली आहे. सुमारे चौपट पाणीसाठी वाढला आहे. पाण्याचा विसर्ग देखिल वाढणार आहे.सातारा शहराला मुबलक म्हणजे सुमारे 35 एमएलडी पाणी दररोज उपलब्ध होण्याकरीता सध्याची पाईपलाईन शिवाय नवीन 87 कोटी 21 लाखांचा प्रस्ताव दिला होता. यामध्ये 900 एमएम व्यासाची अतिरिक्त पाईपलाईन तसेच जलशुध्दीकरण केंद्र उभारणे व अनुषंगीक कामांचा समावेश आहे. आम्ही स्वतः या खात्याचे मंत्री ना. हरदिपसिंग पुरी यांची भेट घेवून प्रस्ताव त्वरीत मंजूर करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ना. पुरी यांच्या नगरविकास मंत्रालयाने 87 कोटी 21 लाख रुपयांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजूरी प्रदान केली आहे. प्रशासकीय मंजूरी मिळाल्याने आता अतिरिक्त पाईपलाईन व अनुषंगीक कामे मार्गी लागणार आहेत. अतिरिकत् पाईपलाईनचे काम करताना कास पाणीपुरवठा खंडीत होणार नाही आणि नैसर्गिकदृष्टया जास्त शुध्द असलेल्या कासच्या पाण्याचा पुरवठा सध्या पाणीपुरवठा होत असलेला भागासह, उर्वरित शहर भाग
तसेच सदरबझार, गोडोली, शाहूनगर या भागासाठीही करण्याचे नियोजन आहे.जनहित आणि बहुजन लोकहितासाठी वाट्टेल ते हे आमचे ब्रीदच असल्यासारखे आहे. आमचे प्रस्ताव
म्हणजे फोटोसेशन अशी ओरड करणा-यांना आता कोरड पडेल अश्या रितीने, 87 कोटींच्या कामाला प्रशासकीयमंजूरी मिळाली आहे. आमच्या या सिझल्ट ओरिएंटेड कामांचा ठसका संबंधीतांना नक्कीच बसेल असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमूद केले आहे.

Adv