Thursday, September 10, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; स्थानकावर लवकरच लिफ्टची सुविधा उपलब्ध

रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; स्थानकावर लवकरच लिफ्टची सुविधा उपलब्ध

161
Adv

पुणे रेल्वे स्थानकावर येत्या तीन महिन्यांत प्रवाशांसाठी लिफ्टची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भातील निविदा प्रक्रिया सुरू आहे. यामुळे दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळणार आहे.पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर येत्या तीन महिन्यांत प्रवाशांसाठी लिफ्टची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भातील निविदा प्रक्रिया सुरू आहे. यामुळे दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक इंदू दुबे यांनी अमृत भारत योजनेतील स्थानकांच्या उद्घाटनासंदर्भात शुक्रवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यांच्यासह या वेळी रेल्वेच्या पुणे विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, सहायक वाणिज्य व्यवस्थापक शीलभद्र गौतम व अन्य अधिकारी उपस्थित होते.

दुबे म्हणाल्या की, 5 लिफ्ट बसविण्याचे नियोजन आहे. त्यातील 3 लिफ्ट येत्या तीन महिन्यांच्या आत बसविणार आहे. त्यात प्लॅटफॉर्म क्रमांक 4-5 दरम्यान लोकेशन मिळाले आहे.
अमृत भारत योजनेत पुणे विभागातील स्थानकांचे उद्घाटन
अमृत भारत स्थानक योजनेच्या दुसर्‍या टप्प्यात पुणे रेल्वे विभागातील देहूरोड, चिंचवड, हडपसर, लोणी, उरुळी, वाठार, लोणंद, सांगली, केडगाव, बारामती आणि कराड स्थानकांचे अपग्रेडेशन आणि विविध 25 ठिकाणी रोड ओव्हर ब्रिज/भुयारी मार्ग यांचे बांधकाम, याचा पायाभरणी शुभारंभ व उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक 26 फेब्रुवारी रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात येणार आहे, असेही दुबे यांनी यांवेळी सांगितले.

Adv