Tuesday, April 21, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City रस्ते वापरादरम्यान वाहन चालकांचा आदर करा

रस्ते वापरादरम्यान वाहन चालकांचा आदर करा

115
Adv

रस्ता सुरक्षा अभियानामध्ये सर्वांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला असुन त्या दरम्यान आपण नियमांची माहिती व उजळणी केली आपण आपल्या सोबत इतरांचीही सुरक्षितता साध्य केल्यास अपघाताचे प्रमाण कमी होणार आहे. आपल्या संकृतीचा महत्वाचा गुणधर्म म्हणून इतरांप्रती आदर याचा उल्लेख केला जातो. त्याप्रमाणे रस्ता वापर करताना इतर वाहन धारकांचा आदर करा जेणेकरुन सुरक्षितता साध्य होईल. आपण सुरक्षित राहिलो तरच व्यक्तीचे व्यक्तीमत्वविकास होऊन समाजाचा विकास होणार आहे.असे मत प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी व्यक्त केले.

यावेळी ते म्हणाले सामाजिक सुरक्षितता राखण्यासाठी रस्ता सुरक्षेबाबत समाजामध्ये
आकांक्षा निर्माण करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येकाने आपण, स्वतः, कुटुंब व आपल्या सभोवताली असणाऱ्या सर्वांपासून रस्ता सुरक्षा साध्य करण्यासाठी नियमांचे पालन करण्याबाबत सुरुवात करुन शिस्तीचे व
वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केलेसदर कार्यक्रमासाठी श्री. संदीप म्हेत्रे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, कार्यालयीन अधिकारी वकर्मचारी, मोटार ड्रायव्हिंग स्कूल संघटना, सातारा प्रतिनिधी, वाहन वितरक प्रतिनिधी उपस्थित होते.श्री. सतिश शिवणकर, वरिष्ठ सहायक यांनी कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांचे रस्ता सुरक्षा
अभियांतर्गत योगदान याबाबत मनोगत व्यक्त केले. वाहन चालकांनी रस्ता सुरक्षेविषयी सर्व नियमांचे उदा. हेल्मेटचावापर करणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर न करणे, सीटबेल्टचा वापर करणे, तसेच अपघातग्रस्तांना तात्काळ
मदत करा असे आवाहन केले.

रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान-2024 विविध उपक्रमांमध्ये उत्स्फुर्त सहभाग घेऊन अमुल्य योगदानदिल्याबद्दल आणि रस्ता सुरक्षा अभियान यशस्वी केल्याबद्दल श्री. अश्विनकुमार पोंदकुले, मो.वा.नि., श्री. रविंद्र चव्हाण, मो.वा.नि., श्री. गजानन गुरव, मो.वा.नि., श्री. दिग्विजय जाधव, मो.वा.नि., श्री. योगेश ओतारी, मो.वा.नि.,श्रीमती स्वाती चव्हाण, मो.वा.नि. यांच्या सोबत काही सहायक मोटार वाहन निरीक्षक, काही कर्मचारी व इतर यांना
“प्रशस्तिपत्रक” देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना श्री. संग्राम देवणे, सहा. मोटार वाहन निरीक्षक यांनी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन श्रीमती पूजालोखंडे, सहा. मोटार वाहन निरीक्षक यांनी केले. आभार प्रदर्शन कार्य श्री. विशाल थोरात, सहा. मोटार वाहन
निरीक्षक यांनी केले.

Adv