Monday, April 20, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City राज्यपाल हरिभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात

राज्यपाल हरिभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात

233
Adv

राज्यपाल आणि महाराष्ट्रातील भाजपचे नेते हरिभाऊ बागडे यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. हरिभाऊ बागडे यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. या अपघातामध्ये ते थोडक्यात बचावले.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक स्फोट झाला. ही घटना शनिवारी सायंकाळच्या सुमरास घडली. पाली येथून हेलिकॉप्टरने उड्डान घेत असताना ही घटना घडली. हेलिकॉप्टरच्या मागच्या भागात स्फोट झाला. स्फोट होताच धूर निघू लागला. स्फोट झाल्याचे लक्षात घेता पायलटने तात्काळ हेलिकॉप्टरचे सुरक्षित लँडिंग केले. त्यामुळे सुदैवाने या अपघातामध्ये पायलटसह हरिभाऊ बागडे थोडक्यात बचावले.

हेलिकॉप्टरमध्ये झालेल्या स्फोटाचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. हरिभाऊ बागडे हे राजस्थानवरून पाली येथील एका कार्यक्रमासाठी आले होते. हा कार्यक्रम झाल्यानंतर ते जयपूरला निघाले होते त्याचवेळी ही घटना घडली. या घटनेमुळे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या सुरक्षेतील मोठी चूक आढळून आल्याचे सांगितले जात आहे. राज्यपाल बागडेंची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आपत्कालीन प्रोटोकॉल लागू केला जाऊ शकतो. सध्या या अपघाताची चर्चा होत आहे.

Adv